पुणे

... इसलिए हम हर साल पूना आते है 

सकाळवृत्तसेवा

पुणे : ''गणेशजी के मेले में कुछ पैसे मिलेंगे, इसलिए हम हर साल पूना में आते है। ब्रेसलेट, खिलौने बेचते है। उसी पैसों से कुछ महिने खेतीबाडी करते है ।'' अशा शब्दांत देशाच्या कानाकोपऱ्यांतून खास गणेशोत्सवादरम्यान छोट्या-मोठ्या वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या महिला, पुरुषांनी आपली भावना व्यक्त केली आहे. 

राजस्थान, गुजरातसह उत्तर भारतातली ही मंडळी सहा महिने उत्सवांमध्ये कलाकुसरीच्या वस्तू विकून पैसे मिळवितात. त्याच पैशांतून आपली गुजराण करत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारच्या कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, फुलेविक्री करून त्यावर उदरनिर्वाह करणारी कुटुंबे पुण्यात दाखल होतात. 

पदपथ, छोटीशी झोपडी किंवा दुकानांसमोरील छोट्याशा जागेतच आपले छोटे व्यवसाय करायचे. रात्री तेथेच मिळेल ते खायचे, झोपायचे आणि दुसऱ्या दिवशी कडेवर लहान मूल घेऊन 'भैय्या खिलौने लेलो' म्हणत या महिला व्यवसाय करत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. या महिला राजस्थान, गुजरात, बिहार आदी राज्यांतून आलेल्या आहेत. राजस्थानच्या कलमोरी, माधवपुरा या जिल्ह्यांमधील 50 हून अधिक कुटुंबे एकमेकांच्या आधाराने उत्सवामध्ये वस्तू विकत आहेत. 

बांगड्या, विविध प्रकारच्या माळा, खेळणी, तांदळावर नाव कोरणे, मेहंदी काढणे, प्लॅस्टिकचे ब्रेसलेट बनविणे, उत्तर भारतातील प्रसिद्ध शाल, चादर, कपडे आणि अन्य कलाकुसरीच्या वस्तू विकण्याचे काम या महिला करत आहेत. 

'इनी पैसों से खेती करते है' 
'गणेशजी के मेले में हम हर साल आते है, लेकिन पहले दिनसेही बारीश शुरू है। इसलिये लोग माल नही ले रहे है । ऐसे मेले में मिलनेवाले पैसोंसेही हम खेतीबाडी करते है। अनाज उगाते है।'' अशा प्रतिक्रिया काही महिलांनी दिल्या. या महिला व पुरुष सहा महिने उत्सवात व्यवसाय आणि उर्वरित सहा महिने कुटुंब व शेतीमध्ये लक्ष देतात. मुले, वृद्धांना घरी ठेवून फक्त नवजात बालकांनाच उत्सवकाळात ते आपल्याबरोबर ठेवतात. मात्र, यंदा पाऊस, पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या रोजीरोटीवर पाणी फिरविले जात असल्याची कैफियत त्यांनी मांडली. 

उत्सवांतून सुटतो रोटीचा प्रश्‍न 
दहीहंडी, गणपती (मुंबई, पुणे), नवरात्री (गुजरात), होळी (बिहार), दुर्गापूजा (कोलकता), गुरुपुरब (पंजाब), पोंगल (तमिळनाडू) यांसारख्या देशाच्या कानाकोपऱ्यांतील उत्सवांमध्ये या महिला- पुरुष वस्तूंची विक्री करण्यासाठी आवर्जून जातात. काही उत्सवांमध्ये वर्षभर पुरेल इतके पैसे मिळतात, तर काही उत्सवांमध्ये घरी परतण्यासाठीही पैसे राहात नाहीत, असे काही महिलांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT