KRK26B04010
करकंब (ता. पंढरपूर) : येथे पोलिस ठाण्यामार्फत आयोजित गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे.
---
डीजे नको; सामाजिक उपक्रमांचा जागर हवा
करकंब पोलिस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांचा एकमुखी निर्णय
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. ८ : गणेशोत्सव सामाजिक एकोपा, पर्यावरण संवर्धन व जनजागृतीचा उत्सव असून तो शांततामय, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात साजरा करावा. डीजे दणदणाट नको, स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती, महिला व बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती आणि सामाजिक सलोखा यांसारखे उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देण्याबाबत एकमत झाले.
करकंब पोलिस ठाणे हद्दीतील गावांमधील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलिस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, मूर्तिकार तसेच डीजे चालकांची बैठक पोलिस ठाण्यात घेण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘डीजेमुक्त गणेशोत्सव’, ‘एक गाव-एक गणपती’ तसेच मंडळांनी गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होऊन विधायक व सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.
मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, चोवीस तास स्वयंसेवक नेमावेत, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, आक्षेपार्ह देखावे व बॅनर टाळावेत तसेच ग्राम सुरक्षा दल व युवकांचा सहभाग वाढवावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.