लोगो : आले गणराय...
गणरायासाठी विद्युत दिव्यांचा झगमगाट
चक्री माळा, लुकलुकणारी सुदर्शन चक्रे, पाना-फुलांतील दिवे बाजारपेठेत
सातारा, ता. १० : विद्युत झोताचे रोप, चक्री माळा, लुकलुकणारी सुदर्शन चक्रे आणि विविध प्रकारच्या पाना- फुलातील दिव्यांनी या वर्षीची सजावट गणेश भक्तांना करता येणार आहे. विद्युत सजावटीच्या साहित्यात या वर्षी अनेक नवे प्रकारचे दिवे विक्रेत्यांनी बाजारात आणले आहेत.
गणेशची प्रतिष्ठापना केल्यावर त्याचा परिसर, सजावट प्रसन्न आणि आकर्षक असावी, यासाठी सर्वजण विविध प्रकारची आरास करतात. कलाबुतीच्या झालरी, कागदी पंखे, कृत्रिम पाना- फुलांच्या माळा अशा अनेक वस्तू वापरत सजावट केली जाते. मात्र, सजावटीवर लखलखाट होतो तो विद्युत दिव्यांनीच. गणेश भक्तांची आणि कार्यकर्त्यांची ही गरज भागविण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारचे विद्युत दिवे, माळा, फोकस असे साहित्य विक्रीस आले आहे.
विद्युतरोषणाईच्या साहित्यात फिरणारी चक्रे, पानांच्या व फुलांच्या विद्युत दिवे असलेल्या माळा, रोप लाईट, निऑन लाइट माळा, चक्र मखर, मोराची सजावट आणि त्यावर आकर्षक दिवे असे साहित्य विक्रीस आले आहे.
यातील दोन बाय दोनचे चक्र साडेसातशे रुपयास उपलब्ध आहे, तर पानांच्या माळा सहाशे रुपयांपासून आहेत. रोपलाइट ४० रुपये, तर निऑन लाइटचे रोप ७० रुपये मीटर आहे. चक्री माळा २०० ते ८०० रुपयापर्यंत विक्रीस आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते विद्युत दिव्यांच्या रोषणाईवर नेहमीच भर देतात. गणपतीच्या मंडपात दिव्याचा झगमगाट करतातच आणि परिसरातही माळा लावून सर्वत्र लखलखाट करतात. सजावटीत विद्युत दिव्यांवर जास्त खर्च केला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांची पसंती विविध रंगांच्या माळा आणि रोप लाइटला असते, तर विविध रंगाच्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या माळांना घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी जास्त मागणी आहे, अशी माहिती व्यावसायिक गौरव भोईटे यांनी दिली.
............................................
सजावटीत फुलांच्या माळातही विविधता
गणरायाची सजावट आकर्षक व्हावी, यासाठी कार्यकर्ते, नागरिक विविध साहित्याचा वापर करतात. त्यामध्ये कलाबुतीच्या कृत्रिम फुलांच्या माळा, सोनेरी हंड्या जोडलेल्या माळा, पाण्यातील कृत्रिम कमळे यांच्या किमती साधारण ७० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. माळांची लांबी, त्यात वापरलेले साहित्य यावर त्यांच्या किमती आहेत. कागदी पुठ्ठ्याचे आकर्षक मखरांनाही मागणी आहे.
फोटो :....... PNE26W48522
सातारा : विविध प्रकारच्या सजावटीच्या विजेवरील साहित्याने दुकाने भरून गेली आहेत. (नरेंद्र जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)
..................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.