पुणे

गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्या

CD

अनधिकृत वीज जोडणीसह ओव्हरलोडिंग टाळा
महावितरणचे आवाहन; गणेशोत्सवात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्या

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : सार्वजनिक गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असताना उत्सवाच्या काळात विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. गणेश मंडळांचे मंडप, घरगुती गणपती, दुकाने तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई केली जाते. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर अतिरिक्त भार येण्याची शक्यता असून, विद्युत सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास शॉर्टसर्किट, आग किंवा जीवितहानीचा धोका निर्माण होऊ शकतो.

मंडप उभारताना जवळून जाणाऱ्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे. मंडप, कमानी, ध्वज, पताका, सजावटीचे साहित्य किंवा लोखंडी संरचना वीजवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. वीजखांब, रोहित्रे अथवा अन्य विद्युत यंत्रणेला सजावट बांधू नये.

अनधिकृत जोडणी टाळा
गणेश मंडळांनी अनधिकृतपणे वीजजोडणी घेऊ नये. तात्पुरत्या वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा ग्राहक मोबाइल ॲपवर ऑनलाइन अर्ज करावा अथवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिकृत पद्धतीनेच वीजपुरवठा घेतल्यास अपघाताचा धोका कमी करता येईल.

ओव्हरलोडिंगपासून सावधान
एकाच सॉकेटवर अनेक विद्युत उपकरणे जोडू नयेत. क्षमतेपेक्षा अधिक भार वापरल्यास वायर तापणे, शॉर्टसर्किट होणे किंवा आग लागण्याचा धोका असतो. खराब, तुटलेल्या किंवा उघड्या तारांचा वापर टाळावा. दर्जेदार व मानांकन प्राप्त विद्युत साहित्याचाच वापर करावा.

मिरवणुकीत घ्या काळजी
गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वज, लोखंडी रॉड किंवा सजावटीचे साहित्य वीजवाहिन्यांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. उत्सवाचा आनंद सुरक्षित आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी गणेश मंडळे व नागरिकांनी विद्युत सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Quota Protest: मराठा आरक्षणासाठी मंगळवेढ्यात ठिय्या आंदोलन; तोडगा न निघाल्यास ४ सप्टेंबरला मंगळवेढा बंदची हाक

IPS Officers Transfer : पोलिस विभागात मोठा फेरबदल; ८ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 'या' सरकारचा तडकाफडकी निर्णय

'ऑपरेशन सिंदूर'चे नायक ते आता राम मंदिराचे नवे CEO, कोण आहेत निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा?

SBIच्या ग्राहकांनो लक्ष द्या! 'या' दिवशी UPI सेवा राहणार बंद; आर्थिक व्यवहार करण्यासाठी दिला पर्याय

Pune Mobile Recovery : ओतूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; तांत्रिक तपासातून २५ गहाळ मोबाईल शोधून सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल मालकांना परत

SCROLL FOR NEXT