पुणे

अखेरचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग

CD

चास, ता. ५ : गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने मूर्तींवर रंगाचा अखेरचा हात फिरवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. पावसाने उसंत घेतल्याने कामाला वेग आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ झाल्याचे वाडा (ता. खेड) येथील मूर्ती कारागीर मंगेश सोमवंशी यांनी सांगितले.
मूर्तिकार सहा महिने आधीपासून तयारी करतात. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वाळण्यासाठी ऊन आवश्यक असते. यंदा पावसाने उघडीप दिल्याने मूर्ती वेगाने तयार होत आहेत. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मूर्तींच्या किमतीही वाढल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच्या संततधार पावसामुळे मूर्ती वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान होते, मात्र आता हवामान अनुकूल आहे.
मंगेश सोमवंशी, तृप्ती सोमवंशी, श्रृती पानसरे, ज्योती कदम यांनी सांगितले की, यंदा भक्तीमय मालिकांमधील पात्रांच्या रूपातील मूर्तींना मोठी मागणी आहे. यात खंडोबा रूप, घोड्यावरील गणेशमूर्ती, साईबाबा रूप आणि बैलगाड्यावरील मूर्तींचा समावेश आहे. तरीही लालबागचा राजा आणि दगडूशेठ हलवाई रूपातील मूर्तींची क्रेझ कायम आहे. राजगुरुनगरच्या तुलनेत वाडा, कडधे, चास या ग्रामीण भागात किमती कमी असल्याने शहरातील नागरिक ग्रामीण भागातून मूर्ती खरेदीला प्राधान्य देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

Manchar News : २५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, दीड महिन्यापूर्वी झालेलं लग्न; पत्नीसह कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Mangalwedha News : दामाजीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आंदोलन 22 व्या दिवशी मागे

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

SCROLL FOR NEXT