पुणे

संवादातूनच सुसंस्कृत गणेशोत्सव शक्य

CD

पुणे, ता. १० : ‘‘गणेशोत्सवातील डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरोधातील लढा हा नागरिक विरुद्ध गणेशोत्सव मंडळे असा नाही. मंडळांचे कार्यकर्ते हे समाजाचाच भाग असून, संवाद आणि समन्वयातूनच उत्सव अधिक सुसंस्कृत, रुबाबदार आणि सर्वांना आनंद देणारा करता येईल,’’ असे मत ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी व्यक्त केले.

‘जागरूक पुणेकर नागरिक समिती’तर्फे आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. या वेळी सौरभ वीरकर यांनी पाटील यांच्याशी संवाद साधला. सोलापुरात डीजेविरोधात उभ्या राहिलेल्या जनचळवळीचा संदर्भ देत पाटील म्हणाले, ‘‘सोलापूर येथे ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, विद्यार्थी, वकील आणि विविध सामाजिक घटकांनी एकत्र येत आवाजाविरोधात भूमिका घेतली. विशेष म्हणजे हा लढा कुणालाही दुखावून नव्हे, तर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन उभा राहिला. त्यामुळे सोलापुरातील ५०० हून अधिक मंडळांनी डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेतला. पुण्यातही कायद्याच्या सक्तीपेक्षा आत्मपरीक्षण आणि परस्पर समजूतदारपणातून उत्सवातील अनिष्ट प्रवृत्ती दूर करण्याची गरज आहे. उत्सवाचा जल्लोष असावा; मात्र त्यातून इतरांना त्रास होऊ नये, यासाठी लक्ष्मणरेषा आखली पाहिजे.’’

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘बंदिस्त मैदानांसाठी डिझाईन केलेल्या साउंड सिस्टीम, डोळ्यांना इजा करणारे लेझर बीम आणि कर्णकर्कश प्लाझ्माला बहुतांश मंडळांचा विरोध आहे. मात्र, प्रशासनाने केवळ पोलिसांचा बडगा दाखवण्याऐवजी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा सन्मान राखला, तर ते स्वतःहून नियम पाळतील.’’

नगरसेवक कुणाल टिळक म्हणाले, ‘‘पुण्यात गणेशोत्सव, दहीहंडी आणि अन्य सण-उत्सवांसाठी स्पष्ट धोरण नसल्यामुळे दरवर्षी नियमांवरून वाद निर्माण होतात. त्यामुळे सर्वधर्मीय सण आणि जयंत्यांसाठी महापालिकेने समान आणि स्पष्ट ‘समान धोरण’ तयार करावे.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT