पुणे

मोफत अन्नवाट किती सुरक्षित ?

CD

पिंपरी, ता. १८ : गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना दिल्या जाणाऱ्या महाप्रसादाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कडक पावले उचलली आहेत. सद्यस्थितीत शहरातील अंदाजे दोन हजार केटरर्स किंवा स्वयंपाकी असताना केवळ २०० जणांनी महाप्रसाद बनवण्यासाठी अधिकृत नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे उत्सवाच्या काळात हजारो भाविकांना वाटप केल्या जाणाऱ्या मोफत अन्नाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत २ हजार ३५२ आणि पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ५०० तर महापालिकेकडे २५१ गणेश मंडळांची नोंद आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार यंदा गणेश मंडळांना महाप्रसाद पुरवणाऱ्या सर्व केटररकडे ‘एफएसएसएआय’चा वैध परवाना असणे बंधनकारक झाले आहे. असे असतानाही हजारो छोटे केटरर व मोदक आणि प्रसाद बनवणारे व्यावसायिक या प्रक्रियेपासून दूर आहेत.
नियमांचे पालन न करणाऱ्यांवर थेट अन्न जप्ती आणि दंडात्मक कारवाईचा इशारा ‘एफडीए’ प्रशासनाने दिला आहे. महाप्रसादाचे किंवा अन्नदानाच्या आयोजनासाठी पूर्वनोंदणी आणि अधिकृत परवाना बंधनकारक आहे. शहरात लहान-मोठी हजारो गणेश मंडळे आहेत. केटररच्या नोंदणीचे प्रमाण पाहता एवढ्या मोठ्या शहरात उत्सव काळात होणारे मोफत अन्न वाटप नेमके किती सुरक्षित असणार, याविषयी मोठे प्रश्‍नचिन्‍‍ह निर्माण झाले आहे.
मंडळांची आणि नागरिकांची जबाबदारी वाढली
केटररच्या अल्प प्रतिसादामुळे गणेश मंडळांनीही अन्नदान आयोजित करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही अनधिकृत किंवा विना-परवाना स्वयंपाक्यांकडून महाप्रसाद बनवून घेतल्यास संबंधित मंडळालाही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. प्रशासनाने गणेश मंडळांना केवळ वैध ‘एफएसएसएआय’ नोंदणी असलेल्या केटरर्सचीच निवड करण्याचे आवाहन केले आहे.

मंडळे कधी करतात अन्नदान ?
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे प्रामुख्याने गणेशोत्सवाच्या काळात विसर्जन मिरवणुकीच्या आदल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करून अन्नदान करतात. याशिवाय, काही मोठी मंडळे माघी गणेशोत्सव, अंगारकीला अन्नदान करतात. काही मंडळांच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवातील सातव्या दिवशी या पारंपरिक अन्नदानाचे आयोजन केले जाते.
---
उत्सवाच्या दहा दिवसांत महाप्रसादाच्या दर्जावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ‘एफडीए’ने विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे. अन्न तयार करताना अस्वच्छता आढळल्यास किंवा परवान्याशिवाय महाप्रसाद वाटप केल्यास कायदेशीर कारवाई व दंडात्मक पावले उचलली जातील. त्यामुळे गणेशाच्या भक्तीत दंग होण्यापूर्वी मंडळांनी प्रसादाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन तात्काळ नोंदणी पूर्ण करावी.
- संजय चट्टे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT