पुणे

गणेशोत्सवात ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याचे आवाहन

CD

मंचर, ता. १९ : ‘‘गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गावातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय करावे. तसेच ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध आणि शासनाच्या नियमांचे पालन करण्याबाबत ग्रामस्थांमध्ये पोलिस पाटील यांनी जनजागृती करावी,’’ असे आवाहन मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिस पाटील यांच्या झालेल्या बैठकीत वाघमोडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी पोलिस पाटलांनी समन्वय ठेवावा. गावात कोणतीही अनुचित घटना, वाद-विवाद अथवा संशयास्पद हालचाल निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि शासनाच्या नियमांचे पालन करून साजरा करावा.
यानिमित्ताने ग्रामीण भागातील चोरी, घरफोडी, शेतीमाल चोरी यांसारख्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल पुन्हा सक्रिय करण्यावर भर देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. तसेच ‘आपले गाव-आपली निगराणी’ या उपक्रमांतर्गत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, दुकानदार, व्यापारी, पेट्रोलपंपधारक व व्यावसायिकांच्या सहभागातून गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पोलिस पाटील यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज वाघमारे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT