पुणे

गणेशोत्सवात मिठाई महागली

CD

गणेशोत्सवात मिठाई महागली

साखर, गुळाच्या भाववाढीचा परिणाम

मयूर फडके : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : गणेशोत्सवात उकडीचे मोदक, तळलेले मोदक, पेढे आणि पारंपरिक मिठाईला मोठी मागणी असते. गणपतीच्या नैवेद्यासाठी तसेच नातेवाईक, मित्रमंडळी आणि पाहुण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर मिठाईची खरेदी केली जाते, मात्र यंदा वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे मिठाई विक्रेत्यांनी भावात वाढ केली आहे.
साखर आणि गुळाच्या भावात झालेल्या वाढीचा परिणाम मिठाईच्या किमतींवर झाला आहे. मिठाईच्या किमतीत किमान २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मोदक आणि पेढ्यांसह विविध मिठाईचे भाव वाढल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. साखर आणि गुळाच्या भावात वाढ झाल्याने मिठाई तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाढला आहे. त्यातच खोबरे, खवा, तूप, दूध, सुकामेवा यांसारख्या कच्च्या मालाच्या किमती आणि कामगारांचा खर्चही वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे यंदा मोदक, पेढे आणि लाडू महागणार आहेत.
मोदक तयार करण्यासाठी मनुष्यबळ लागते, त्यासाठीही वेगळी वाढीव मजुरी मोजावी लागते, त्यामुळे भाववाढ पटत नसली तरी ती करावी लागते, असे पाटणकर या घरगुती व्यावसायिकांनी सांगितले. तर घाऊक साखरेचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली असली, तरी त्याचा परिणाम किरकोळ बाजारात पोहोचण्यास ७ ते १४ दिवस लागू शकतात. तोपर्यंत मिठाईच्या किमतीत १५ ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असेल. सणासुदीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याचे गोखले गृह उद्योग यांनी सांगितले.


साखर आणि गुळाच्या किमती वाढल्या आहेत. तरी आम्हाला वर्षानुवर्षे ग्राहकांशी असलेले संबंध जपावे लागतात. तेच आमच्यासाठी महत्त्वाचे म्हणून आम्ही यंदाच्या वर्षी भावात फक्त १० टक्क्यांची वाढ केली आहे.
- मनोरंजन लाडू डेपो, दादर


यावर्षी गॅस सिलिंडर महाग झाल्याने तसेच तो मिळत नसल्याने आम्ही उकडीच्या मोदकांच्या किमतीत वाढ केली होती. त्यात आता साखर, गूळ महाग झाले, आम्ही आधीच ग्राहकांकडून उकडीच्या मोदकांची ऑर्डर घेतली असल्याने पुन्हा भाववाढ करणे योग्य नाही.
- विश्वास बेडेकर, बेडेकर स्टोअर, बोरा बाजार


साखर, गूळ, खोबरे आणि मोदकासाठीचे साहित्य हे सगळेच महाग झाले आहे. मुळात वाहतूक खर्च महाग पडत असल्याने २० ते २५ टक्के उकडीच्या मोदकांची भाववाढ केली आहे.
- प्रिया वाडकर, घरगुती व्यावसायिक
........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT