Cigarette sakal
पुणे

पत्नीला सिगारेटचे चटके देऊन छळ केल्याप्रकरणी गणेश गायकवाडला अटक

आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून अघोरी कृत्य तसेच पत्नीला सिगारेटचे चटके देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात गणेश नानासाहेब गायकवाड याला सोमवारी (ता. २६) अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून अघोरी कृत्य तसेच पत्नीला सिगारेटचे चटके देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात गणेश नानासाहेब गायकवाड याला सोमवारी (ता. २६) अटक करण्यात आली.

चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी गणेश गायकवाड, त्याचे वडील नानासाहेब गायकवाड, आर्इ नंदा गायकवाड यांच्यासह एकूण नऊ जणांवर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गायकवाड याच्या २७ वर्षीय पत्नीने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली.

खंडणी, जीवे मारण्याची धमकी, खासगी सावकारीसह विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेल्या गणेश गायकवाडला या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यात गायकवाड हा मुख्य आरोपी आहे. त्याने पत्नीला सिगारेटचे चटके दिले आहेत. त्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादी यांचा एक कान कायमस्वरूपी बहिरा झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांचा पासपोर्ट, पॅनकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, दागिने, लग्नात दिलेली चांदीची भांडी, देवपूजेचे साहित्य लपवून ठेवले आहे. तसेच आध्यात्मिक गुरूच्या सांगण्यावरून फिर्यादी यांच्यावरून लिंबू उतरविण्याचे अघोरी कृत्य केले आहे. याबाबत तपासासाठी आरोपीला पाच दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत गायकवाडला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Protest : 'मी दोन-चार दिवसांत मरणारा नाही'; सोनम वांगचुक यांचे सरकारला थेट आव्हान, २० जुलैच्या 'चलो संसद' मोर्चासाठी जनतेला आवाहन

Maharashtra farmer: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे ₹48 हजार कोटींचे वीजबिल माफ; वर्षाअखेरीस 12 तास मोफत दिवसा वीज, कर्जमाफीनंतर आणखी दिलासा

Maharashtra Weather Update : मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, 'या' जिल्हांना येलो अलर्ट जारी

Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Vaibhav Sooryavanshi: इंग्लंडमधील अपयशानंतर १५ वर्षांचा वैभव 'बॅक टू वर्क; दौऱ्यावरून परताच घरी राहण्याऐवजी कुठे गेलाय पाहा Video

SCROLL FOR NEXT