VRG26B06218
वैराग (ता. बार्शी) : येथे शिव शंभू प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात पोवाडा सादर करताना शाहीर गणेश गलांडे व त्यांचे सहकारी.
---
शिव शंभू प्रतिष्ठानतर्फे शिवविचारांचा जागर
वैराग : येथील शिव शंभू प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाहीर गणेश गलांडे यांच्या शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाहीर गलांडे यांनी पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जन्मापासून प्रतापगडाचा रणसंग्राम उपस्थित रसिक श्रोत्यांसमोर मांडला. तसेच स्त्री-भ्रूणहत्या थांबवा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा समाज प्रबोधन करणारा संदेश पोवाड्यातून दिला. यावेळी नगरपंचायतीचे सभापती नागनाथ वाघ, नगरसेवक अजय काळोखे, गोविंद ताटे, सतीश सुरवसे, अतुल मोहिते, प्राचार्य खंडेराया घोडके आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिव शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष उत्कर्ष डुरे पाटील, उपाध्यक्ष लखन वाघमारे, आदींसह प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरासह वैराग व वैराग परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.