फोटो ः गणेश देवखिळे
गौरबदीप घोष
---------------
गणेश देवखिळे आणी गौरबदीप घोषने पटकाविले जेतेपद
जागतिक मास्टर्स वरिष्ठ टेनिस स्पर्धा
पुणे, ता. १६ ः नांदेड येथे सुरू असलेल्या नांदेड जिल्हा आणि शहर टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित कोहिनूर-एनईएस करंडक एम टी २०० जागतिक मास्टर्स वरिष्ठ गट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत ४० वर्षांवरील गटात गणेश देवखिळे आणी ३५ वर्षांवरील पुरुष गटात गौरबदीप घोषने विजेतेपदाचा मान मिळविला.
आयटीएफ, एआयटीए, एमएसएलटीएच्या मान्यतेने एनईएस सायन्स कॉलेजच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत ४० वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळेने दुसऱ्या मानांकित जय नारायण के.आर.चा रंगतदार सामन्यात २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान मिळविला. त्याआधी उपांत्य फेरीत गणेश देवखिळेने अव्वल मानांकित राम कुमार चौधरीचा ६-२, ७-५ असा तर दुसऱ्या मानांकित जयनारायण के आरने बिगर मानांकित लक्ष्मीनिवास कलंत्रीचा ६-१, ६-२ असा सरळ पराभव केला होता.
३५ वर्षांवरील पुरुष गटाच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोषने शशांक बोमनाळेचा ६-१, ६-० असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याआधी उपांत्य फेरीच्या लढतीत शशांक बोमनाळेने विनीत तेहराचा ६-४., ६-२ असा पराभव केला होता.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल ः
५५ वर्षांवरील गट ः केतन बेडेकर (भारत) वि.वि. जितेंद्र जोशी (भारत) ६-०, ६-१; एलामुरुगु अय्यासामी (भारत) वि.वि. सुनील मिश्रा (भारत) ६-२, ६-३; अशोक इंगळे (भारत) वि.वि. धरमवीरसिंग (भारत) ६-१, ६-३.
६० वर्षांवरीलगट ः आलोक रैना (भारत) वि.वि. एकनाथराव घोडेकर (भारत) ६-१, ६-१; संजय कुमार (भारत) वि.वि. विजय कामत (भारत) ६-३, ६-३.
७० वर्षांवरील गट ः शिव मोर (भारत) वि.वि. शिवाजी चव्हाण (भारत) ६-१, ७-५; श्याम गायकवाड (भारत) वि.वि. नरहरी कडेकऱ (भारत) ६-१, ६-१.
-------------