KRK26B03798, KRK26B03799
फोटो - करकंब : येथील टिळक चौकात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी चालू असलेले होमहवन व पौरोहित्य. (दुसऱ्या छायाचित्रात) प्राणप्रतिष्ठा केलेली आकर्षक संगमरवरी गणेश मूर्ती.
करकंब येथे मंत्राच्या जयघोषात गणपतीची प्राणप्रतिष्ठा
पाच तासाच्या पौरोहित्य; दारोदारी सडारांगोळी अन् मंदिरात फुलांची सजावट
सकाळ वृत्तसेवा
करकंब, ता. २२ : करकंब येथील टिळक चौकात पौराणिक मंत्राच्या जयघोषात आज (रविवार) संगमरवरी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तब्बल पाच तास चाललेल्या पौरोहित्याने टिळक चौक परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सकाळी साडेआठ वाजता प्रथम नवीन गणेशमूर्तीस पुराणोक्त जलाधिवास विधी करण्यात आला. त्यानंतर निद्रा व होमहवन विधी करून मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व नियोजित ठिकाणी गणेश मूर्ती विराजमान करण्यात आली. शेवटी अभिनव तरुण मंडळातील कार्यकर्त्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा व आरती करून महाप्रसाद देण्यात आला. सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य विश्वास जोशी, केदार जोशी, अरूणकाका जोशी, शुभम देव व अक्षय देव यांनी केले.
तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी गणेश मूर्तीची टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोडनिंब चौक, बसस्थानक, पुरवत गल्ली, आत्तार चौक, थोरली वेस या मार्गाने गावातून भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये गावातील हजारो व महिला सहभागी झाल्या होत्या. सदर आध्यात्मिक कार्यक्रमासाठी करकंबसह बार्डी, तुळशी, जळोली, उंबरे, पेहे, नेमतवाडी, मोडनिंब, पंढरपूर, भोसे, टेंभुर्णी, पुणे, सोलापूर, कुर्डुवाडी, आदी भागातून अनेक भक्त मंडळी आली होती.
यावेळी विजय फडणीस, राजेश शहा, संजय शेटे, अरुण काळे, प्रवीण नागरस, पांडुरंग व्यवहारे, संतोष पिंपळे, आत्माराम चवरे, आनंद लिगाडे, आनंद देशमुख, अमृत जोशी, सचिन कुरणावळ, शार्दूल शहा, मनोज शहा, केदार जोशी, नागेश शेटे, विश्वास जोशी, सौरव देशमुख आदींनी अधिक परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.