मंचर, ता. २८ : सामाजिक शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये भरीवकाम केल्याबद्दल मंचर (ता. आंबेगाव) येथील गरुडझेप प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश अनंतराव खानदेशे यांना संजीवनी फाउंडेशन सिन्नर यांच्या वतीने राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
सिन्नर येथील अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिर, येथे ‘माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते रविकांत तुपकर, पद्मश्री पुरस्कार विजेते लोककलावंत रघुवीर खेडकर यांच्या हस्ते खानदेशे यांना गौरविण्यात आले.
खानदेशे यांनी गरुडझेप प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील १५० जिल्हा परिषद शाळांमध्ये आरोग्य शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना सुवर्णप्राश आयुर्वेदिक डोस, हिमोग्लोबिन, रक्तगट, दंत, मुखरोग, नेत्र, तपासणी, उच्च रक्तदाब, डायबेटिस तपासणी करून रुग्णांना गोळ्या औषधे, फळेवाटप, महिला सबलीकरण मेळावे, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध स्पर्धांचे आयोजन, वृक्षारोपण, निराधारांना मदत, शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, असे विविध प्रकारचे कार्यक्रम गेली अनेक वर्षे राबविले आहेत. या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
मंचर नगरपंचायतीचे नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती धनेश मोरडे, महानगर बॅंकचे मॅनेजर विकास खानदेशे, ॲड. संजय बेंडे पाटील, जितेंद्र पोखरकर, कालिदास गांजाळे, उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.