पुणे

गणेश पेठ बाजारात मासळी दर स्थिर

CD

मार्केट यार्ड, ता. २२ : गणेश पेठ येथील बाजारात सर्व प्रकारच्या मासळीची आवक साधारण होत आहे. त्यामुळे मासळीचे तेजीतील दर टिकून होते. शाळांच्या परीक्षांमुळे चिकन, मटण, इंग्लिश आणि गावरान अंडींना मागणी कमी झाली झाली. त्यामुळे अंडी, चिकन, मटणाचे गेल्या आठवड्यातील दर टिकून होते.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता.२२) खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंडीचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १८००-२०००, मोठे : १७००-१८००, मध्यम : १२००-१४००, लहान : ११००-१२००, भिला : ९००-१०००, हलवा : ७००-८००, सुरमई : ८००-१०००, रावस : ८००-९००, घोळ : १०००-१२००, करली : ३५०-४००, करंदी : ४५०-५००, पाला : १२००-१४००, वाम : पिवळी ८००-१०००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : ३००-३५०. कोळंबी : लहान : २५०-४००, मोठी : ४५०-६००, जम्बो प्रॉन्स : १४००-१५००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : ३५०-४००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २५०-३००, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ६००-८००. खाडीची मासळी - सौंदाळे : २५०-३००, खापी : २५०-३००, नगली : ५००-७००, तांबोशी : ५००-६००, पालू : २५०-३००, लेपा : ३५०-४००, बांगडा : १५०-२८०, शेवटे : २५०-३००, पेडवी : १५०, बेळुंजी : १५०-२००, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १५०, तारली : २००-२५०.
नदीतील मासळी : रहू : १६०-१८०, कतला : १८०-२५०, मरळ : ३५०-४००, शिवडा : २००-२५०, खवली : २००-२५०, आम्ळी : १५०-२००, खेकडे : २५०-४००, चिलापी : ८०-१६०, वाम : ५५०-६००.
मटण : बोकडाचे ८००, बोलाईचे ८००, खिमा ८००, कलेजी ८४०. चिकन २४०, लेगपीस ३००, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०. अंडी : गावरान (शेकडा) १२२०, डझन १५०, प्रतिनग १४. इंग्लिश (शेकडा) ५७५, डझन ७८, प्रतिनग ६.५०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Pune News: वाहनांची तपासणी आता अवघ्या सहा मिनिटांत;‘आरटीओ’चे स्वयंचलित चाचणी केंद्र एक मार्चपासून सेवेत, वेळेची हाेणार बचत!

Dive Ghat Pune Traffic Update: दिवेघाटात उद्या दोन तास वाहतूक बंद; आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील रुंदीकरणासाठी निर्णय!

SCROLL FOR NEXT