पुणे

गणरायाची मिरवणूक ड्युसेलडॉर्फमध्ये उत्साहात

CD

गणरायाची मिरवणूक
ड्युसेलडॉर्फमध्ये उत्साहात

ड्युसेलडॉर्फ (जर्मनी), ता. २० : जर्मनीमध्ये महाराष्ट्राची संस्कृती आणि गणेशोत्सवाची परंपरा जपत येथील ‘मराठी मित्र मंडळ डॉइचलँड ई. व्ही.’च्या वतीने रविवारी ड्युसेलडॉर्फ येथे भव्य गणेश मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. भारतीयांसह स्थानिक नागरिकांनीही या मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषामुळे ड्युसेलडॉर्फचे रस्ते मराठमोळ्या वातावरणाने भारून गेले. ‘रामणबाग युवा मंच जर्मनी’च्या ढोल-ताशा पथकाने दमदार सादरीकरण करत वातावरणात उत्साह निर्माण केला. लेझीमच्या तालबद्ध सादरीकरणालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मिरवणुकीत विविध वयोगटांतील भारतीय नागरिक सहभागी झाले होते.
म्युझिकपाविलॉन येथे ड्युसेलडॉर्फचे महापौर डॉ. स्टेफान केलर आणि इन्फोसिस जर्मनीच्या प्रमुख आंद्रेआ हेंड्रिक्स यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला. त्यानंतर भक्तिभावाने महाआरती करण्यात आली. उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवकांनी सुरक्षा, शिस्त, नियोजन आणि प्रसादवाटपाची जबाबदारी सांभाळली. जर्मनीत महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपत भारतीय आणि स्थानिक समुदायांना एकत्र आणणारा हा सोहळा ठरला.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रसाद भालेराव यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या ड्युसेलडॉर्फ शहर प्रशासन, संबंधित विभाग, स्वयंसेवक आणि गणेशभक्तांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT