पुणे

गणरायाच्या स्वागतासाठी स्वमग्न विद्यार्थ्यांची तयारी

CD

पुणे, ता. २० : गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसन्न ऑटिझम सेंटरमधील स्वमग्न विद्यार्थ्यांनी १८ वस्तूंचा समावेश असलेला ‘श्रीगणेश पूजा साहित्य बटवा’ तयार केला आहे. व्यावसायिक प्रशिक्षणातून या विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. गेल्या २६ वर्षांपासून स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेत १३ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना विविध थेरपी आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. यंदा या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने हळद, कुंकू, वाती, अष्टगंध आणि जानवे जोड यांसह पूजेसाठी लागणाऱ्या एकूण १८ वस्तूंचा सुबक बटवा तयार केला आहे. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या पूजा साहित्याला पुणेकर नागरिक आणि विविध संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Politics: अली खान ते इम्रान खान... पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांचा शेवट नेहमीच वेदनादायी का? वाचा राजकारणाचा काळा इतिहास

Jalna News : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटले मुदत संपलेली बिस्किटे, ‘महा-वॉकॅथॉन’मध्ये धक्कादायक प्रकार उघड

Marathi News Live Updates : पेलेट गन प्रकरणी एफआयआर दाखल

MLA Dilip Mohite : उद्योगखाते उदय सामंत यांचा भाऊ चालवितो; माजी आमदार दिलीप मोहिते यांचा आरोप

MP Dr. Amol Kolhe : अंगणवाडी सेविका पारधी यांचे निलंबन म्हणजे ' चोर सोडून संन्याशाला फाशी'

SCROLL FOR NEXT