Ganesh Visarjan esakal
पुणे

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या दोन मंडळावर गुन्हे दाखल

विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकाचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर परिसरातील दोन मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकाचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगर परिसरातील दोन मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष, ध्वनिवर्धक पुरवठादार आणि शिवतीर्थ मंडळाचे अध्यक्ष, ध्वनिवर्धक पुरवठाकादर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी बबलू भिसे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भारतीय न्याय संहितेचे विविध कलम, पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनिप्रदूषण विनियमन, नियंत्रणाच्या कलमांवन्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळ, शिवतीर्थ मंडळ आहे. १७ सप्टेंबर रोजी दोन्ही मंडळांकडून मिरवणूक काढण्यात आली. दोन्ही मंडळांनी कोणतीही परवानगी न घेता उच्चक्षमतेच्या ध्वनवर्धकांचा वापर केला. ध्वनिप्रदुषणाबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. ध्वनी मर्यादेची पातळी ओलांडल्याने रहिवाशांना त्रास झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.

मंडळाने नोटीस स्वीकारली नाही

पोलिसांनी याबाबत दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजाविली. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणी दोन्ही मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारी डी. व्ही. धोत्रे आणि एच. सी. राऊत तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs DC Live : सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, नमन धीरने मुंबई इंडियन्सची लाज वाचवली; दिल्लीच्या गोलंदाजांसमोर इतरांची शरणागती

Mumbai Crime: नवरा कामावरुन परतला, बायको दारुच्या नशेत तर्रर्र; मोहम्मद कुरेशीवर पत्नीचा चाकूहल्ला

Dindori : कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू; रस्त्याच्या मधोमध असलेली विहीर बुजवण्यास सुरुवात, मालकावर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : साखरी जवळी तामसवाडी गावाजवळ अपघात

IPL 2025 Marathi News: तिसऱ्यांदा चुकला तरी श्रेयस अय्यरवर होणार नाही बंदीची कारवाई, पण...; आयपीएलचा नवा नियम घ्या जाणून

SCROLL FOR NEXT