विसर्जनासाठी प्रवरा
नदीपात्रात पाणी सोडा
सत्यजित तांबे यांची मागणी
अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असून, राज्यासह देशात श्री गणेशाचे स्वागत भक्तिमय व आनंदमय वातावरणात होत आहे. संगमनेर शहरातही गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असून, गणेशमूर्तींच्या विधिवत विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात आवश्यक पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.
आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा गणेशमूर्तींची हेळसांड होते. गणेशोत्सव हा नागरिकांच्या धार्मिक व भावनिक श्रद्धेशी जोडलेला मोठा उत्सव असून, गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन हा या उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करताना नदीपात्रात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे.
यापूर्वी प्रवरा नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याने संगमनेर शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन लांबणीवर पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सन २०१२ मध्ये तर पाणी नसल्यामुळे गणेश विसर्जन तब्बल १५ दिवस पुढे ढकलण्यात आले होते. यावर्षीही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि गणेश विसर्जनाच्या दिवशीच संगमनेर शहर व तालुक्यातील गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करता यावे, यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी असणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.