पुणे

वाहनतळात गणपती स्टॉल

CD

पालिकेच्या वाहनतळात गणपती स्टॉल
सातारा, ता. ९ : राजवाड्यानजीकच्या पालिकेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज व्यापारी संकुलाच्या वाहनतळात गणपती मूर्तींच्या विक्रीचा स्टॉल थाटण्यात आल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. आधीच मुख्य बाजारपेठेत वाहन पार्किंगसाठी मोठी तीव्र समस्या असताना पालिका प्रशासनाकडून अशा प्रकारे वाहनतळात व्यावसायिक स्टॉलसाठी परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमध्ये गणेशमूर्तीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी, खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. पोवई नाका, मोती चौक, राजवाडा येथे विविध सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. मोती चौकापासून राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहन लावण्यास बंदी असल्याने नागरिक राजवाड्यासमोरील आणि मोती तळ्यानजीकच्या पालिकेने व्यापारी संकुलात वाहनतळाची सुविधा उभारली आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत आहे. दरम्यान दोन्ही व्यापारी संकुलातील वाहनतळात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच वाहन पार्किंगसाठी हक्काची जागा मिळणे कठीण झाले असतानाच वाहनतळातील स्टॉलमुळे वाहनधारकांना रस्त्यावरच त्यांच्या गाड्या लावाव्या लागता आहेत. त्यातून वाहतूक कोंडी झाल्यास पोलिस प्रशासन वाहनांवर कारवाई करीत आहे. व्यापारी संकुलाच्या राखीव वाहनतळ जागेतच गणपती विक्रीचा स्टॉल थाटण्यात आल्याने पार्किंगसाठीची जागाच मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. पालिका प्रशासनाने या प्रकारची दखल घेऊन कारवाई करावी आणि वाहनतळाची जागा मोकळी करून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट
पालिकेच्या (कै.) अभयसिंहराजे व्यापारी संकुल आणि (कै.) प्रतापसिंहराजे व्यापारी संकुल या दोन्ही व्यापारी संकुलात गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल उभारला असतानाही पालिका प्रशासनाचे अद्याप का लक्ष गेले नाही, असा प्रश्‍न या दोन्ही व्यापारी संकुलातील स्थानिक व्यापारी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. आम्ही शुल्क भरून गाळे घेतले आहेत. वाहन लावण्यासाठी आमची गैरसोय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


फोटोला फोटोग्राफरचे नाव वापरु नका.
PNE26W48290
सातारा ः पालिकेच्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज व्यापारी संकुलाच्या वाहनतळात थाटण्यात आलेला गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल.

---------------पूर्ण--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT