पुणे

दणदणाट करणाऱ्या दहा मंडळांवर गुन्हे

सकाळवृत्तसेवा

पुणे - उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातलेली असतानाही सातव्या दिवशी गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ दणदणाट करणाऱ्या दहा मंडळांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे आठ साउंड सिस्टिम मिक्‍सर व अन्य साहित्य जप्त करून पोलिसांनी मंडळांचा आवाज खाली आणला. सर्वाधिक गुन्हे चंदननगर आणि त्यापाठोपाठ कोथरूड, हडपसर डेक्कन येथील मंडळांविरुद्ध दाखल झाले आहेत.

डीजेवर बंदी घालण्याबाबतची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने सध्या डीजेवरील बंदी कायम ठेवल्याने पोलिसांनी त्याबाबतच्या अध्यादेशाबाबत गणेशोत्सव मंडळांना जागृत केले, असे असतानाही सातव्या दिवशी मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेचा सर्रासपणे वापर केला. तेवढ्यावरच न थांबता ध्वनी पातळीच्या नियमाचेही उल्लंघन केले. मगरपट्टा परिसरातील अखिल बोरीभडक मित्र मंडळाच्या डीजेचा आवाज १२० डेसिबल असल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मांजरी येथील राजहंस गणेश मित्र मंडळानेही १०० डेसिबल इतक्‍या आवाजामध्ये डीजे वाजविला. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. 

चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार मंडळांनी डीजेचा अक्षरशः धुमाकूळ घातला. पोलिसांचा आदेश न जुमानता उशिरापर्यंत डीजे सुरू ठेवला. त्यामुळे, यशवंत तरुण मित्र मंडळ, ज्वाला मित्र मंडळ, विनायक तरुण मित्र मंडळ व एकता मित्र मंडळाविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांचे साहित्य जप्त केले. कोथरूडमधील स्वराज मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, अखिल हनुमाननगर मित्र मंडळाविरुद्ध कोथरूड पोलिसांनी खटले दाखल केले.

 विरुद्ध दिशेने मिरवणूक 
फर्ग्युसन रस्त्यावरील अभि इम्पॅक्‍ट लॉजिस्टिक्‍स सोल्यूशन या कंपनीमध्ये बसविलेल्या गणपतीची बुधवारी रात्री डीजेसह विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान कंपनीचा मालक, मंडळाचे पदाधिकारी यांनी मिरवणुकीसाठी नेमून दिलेल्या मार्गाऐवजी विरुद्ध दिशेने मिरवणूक काढली. डीजे, ढोल-ताशा पथक, बाउंसर व कामगार अशा दीडशे जणांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. ध्वनी पातळी उल्लंघन, वाहतुकीस अडथळा निर्माण करण्याबरोबरच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी कंपनीचा मालक, मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्षासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

‘‘न्यायालयाच्या निर्णयानुसार स्पिकरच्या भिंती उभारण्यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील नऊ ते दहा मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे आठ साउंड सिस्टिम मिक्‍सर जप्त केले आहेत.’’ 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT