Police-Bandobast
Police-Bandobast 
पुणे

सुरक्षेसाठी पोलिस सज्ज

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या संरक्षणासाठी पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. चोरटे आणि गुन्हेगारांवर साध्या वेशातील पथकांची करडी नजर राहणार आहे.  त्यादृष्टीने गुन्हे शाखेने सोमवारपासून उत्सवातील बंदोबस्ताला सुरवात केली आहे.

उत्सवात चोरटे, गुन्हेगारांचा वावर वाढतो. या पार्श्‍वभूमीवर पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेने ठोस उपाययोजना केल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील,  विविध राज्यांतील नागरिकांसह परदेशी भाविक पुण्यात येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी गुन्हे शाखेने विशेष लक्ष दिले आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनानंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होते. या गर्दीमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे २० वरिष्ठ अधिकारी व १२० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. ते साध्या वेशामध्ये गस्त घालणार आहेत. पाकीट, सोनसाखळी, मौल्यवान वस्तू, रोकड चोरणाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून कारवाई केली जाईल. याबरोबरच महिला, तरुणींना छेडणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठीही काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

दक्षतेसाठी ‘कोम्बिंग ऑपरेशन’
देशातील महत्त्वाच्या घडामोडींमुळे दक्षतेचा उपाय म्हणून गुन्हे शाखेकडून सोमवारपासूनच वाहनांच्या तपासणीवर विशेष भर दिला आहे. विशेषतः जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीवर करडी नजर असून, विक्रेते व ग्राहकांची कसून तपासणी करण्यास गुन्हे शाखेने प्राधान्य दिले.

गणेशोत्सवात गुन्हे शाखेचे विशेष लक्ष आहे. उत्सवात गुन्हे घडून भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी १४० हून अधिक अधिकारी-कर्मचारी साध्या वेशात कार्यरत आहेत. 
- अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT