Ganeshotsav 2022 Speakers allowed to play till midnight for last five days CM Eknath Shinde pune sakal
पुणे

गणेशोत्सव २०२२ : शेवटचे पाच दिवस स्पीकर वाजविण्यास रात्री बारापर्यंत परवानगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यंदाचा गणेशोत्सवाला धूमधडाक्यात करू, शेवटचे पाच दिवस स्पीकर वाजविण्यास रात्री बारा पर्यंत परवानगी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्याची परवानगी असेल," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्ट केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली.

यावेळी "जय गणेश व्यासपीठा"चे श्रीकांत शेटे, प्रसाद कुलकर्णी, सुनील रासने, प्रवीण परदेशी, नितीन पंडित, विकास पवार, शिरीष मोहिते, पियूष शहा आदी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

शिंदे म्हणाले, "पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना ऐतिहासिक वारसा आहे. राज्यभरातून अनेकजण गणेशोत्सव पाहायला पुण्यात येतात. यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मंडळांच्या काही मागण्या होत्या, त्याविषयी मंडळाच्या पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. यंदा मंडळाना कोणतीही अडचण येणार नाही, जिल्हाधिकारी यामध्ये लक्ष घालतील. न्यायालयाच्या नियमांचे पालन करून विसर्जन मिरवणूका काढू. कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही, याची योग्य खबरदारी घेतली जाईल."

"गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत उत्सव सुरू ठेवण्यास परवानगी असेल. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात करू, मात्र कोरोनाचे विविध प्रकार पुढे येत असून त्यादृष्टीने योग्य ती काळजी घेऊ. मंडळे सामाजिक कामे करत आहेत, त्याच पद्धतीने मंडळ बुस्टर डोस जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.दहीहंडी मंडळालाही परवानग्या दिल्या आहेत" असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सामंत यांच्या गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही - शिंदे

कोणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा काम करत असेल, अताताईपणा करत असेल तर पोलिस त्यांच्यावर नक्कीच कारवाई करतील.गुन्हा झाल्यावर पोलिसांना कारवाई करा म्हणून सांगवे लागत नाही.दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आपण केले पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT