Ganeshotsav 2022 window scheme Ganeshotsav Mandals Mandals get permission in hour pune  sakal
पुणे

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना, मंडळांना एक तासात परवानगी

आत्तापर्यंत अकराशेपैकी एक हजार अर्जांना पोलिसांनी दिली परवानगी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांकडून पोलिस ठाण्याअंतर्गत "एक खिडकी योजना' सुरु करण्यात आली आहे. मंडळांचे अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतुक शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांकडून मंडळाच्या जागेची पाहणी करुन, कागदपत्रांची तपासणी करुन एक तासातच परवानी दिली जात आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडे अकराशे अर्ज आले असून त्यापैकी एक हजार मंडळांना तत्काळ परवानगी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सुचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सहकार्याची भुमिका घेण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रमुख गणेशोत्सव मंडळे, मानाचे गणेशोत्सव मंडळांसह महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता कमिटी सदस्य व पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या सदस्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिमंडळन निहाय पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा व विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. कर्णिक यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्यासमवेत परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची बैठक सोमवारी घेतली.

दरम्यान, गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये "एक खिडकी योजना' सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिस ठाण्याचे दोन पोलिस, वाहतुक शाखेचे एक व विशेष शाखेचे एक पोलिस अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या परवानगी अर्जाची दखल घेतात. प्रत्यक्षात मंडळांची पाहणी, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यांना परवानगी दिली जात आहे. विशेष शाखेकडे आत्तापर्यंत अकराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार अर्जांना परवानगी दिली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.

"" गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या अर्जांची पाहणी करुन परवानगी देत आहेत. परवानगी देण्याबरोबरच वाहतुक व गर्दीची ठिकाणे निवडून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.''

- डॉ.प्रियांका नारनवरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकलपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

Illegal Liquor: पुण्यातील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सर्जिकल स्ट्राइक, ३ हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

SCROLL FOR NEXT