पुणे

गणेशोत्‍सव समितीच्‍या मागण्‍यांबाबत सकारात्‍मक

CD

गणेशोत्‍सव समितीचे नगराध्यक्षांना निवेदन

सातारा, ता. २ : सातारा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्यांचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिले. दरम्यान, श्री. मोहिते यांनी सकारात्मक दाखवत संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
समितीने नगरपरिषदेकडे पोलिस, वाहतूक शाखेसह इतर विभागांंना सामावून घेणारी ‘एक खिडकी योजना’ सुरू करावी, मोती चौक परिसरातील कॅमेरा दुरुस्ती, मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवणे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे, लटकणाऱ्या केबल व विद्युत तारांची योग्य उंची करणे तसेच मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवणे, गणेशोत्सव काळात राजवाडा चौपाटी शेवटचे पाच दिवस रात्री दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, शेवटच्या पाच दिवसांत रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी आवश्यक परवानगी द्यावी, गणेशोत्सव मंडळांच्‍या जाहिरात करात कपात करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. याबाबत नगराध्यक्ष श्री. मोहिते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना कार्यवाहीच्या सूचना दिल्या. या वेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे, उपाध्यक्ष अभिजित बारटक्के, कार्याध्यक्ष चंद्रशेखर घोडके, सचिव अक्षय गवळी, सावकार मुन्ना बागवान, सुजित परदेशी, अजिंक्य गुजर, पप्पू इंगवले, पंकज चव्हाण, नगरसेवक विश्वतेज बालुगडे, हर्षल चिकणे आदी उपस्थित होते.
.............
४६४८७
सातारा : अमोल मोहिते यांना निवेदन देताना महेश साळुंखे, हर्षल चिकणे. शेजारी अभिजित बारटक्के, चंद्रशेखर घोडके, अक्षय गवळी, विश्‍वतेज बालगुडे व इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT