Noise Pollution sakal
पुणे

Noise Pollution : आवाजाची मर्यादा ओलांडली; पुण्यात मंडळांसह ध्वनिवर्धक यंत्रणा पुरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल

विसर्जन मिरवणुकीत आजावाची मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विसर्जन मिरवणुकीत आजावाची मर्यादा ओलांडणारे मंडळे, तसेच ध्वनिवर्धक यंत्रणा पुरवठादारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी आठ गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे पोलिसांनी विमानतळ, चंदननगर, कोथरूड येरवडा, हडपसर आणि वानवडी भागातील मंडळे तसेच ध्वनियंत्रणा पुरवठादारांवर ही कारवाई केली. विसर्जन सोहळ्यात विविध मार्गांवरील सुमारे ७० ते ८० प्रकरणे ध्वनिमर्यादा तपासण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) पाठविण्यात आले होते.

याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली. २०१८ मध्ये गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचे ६४ तर २०१९ मध्ये १६ गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आवाज १३० डेसिबलच्या पुढे -

निवासी क्षेत्रात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ५५ डेसिबल आणि रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत ४५ डेसिबल अशी ध्वनीमर्यादा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निश्चित केली आहे. याबाबत उच्च न्यायालयाचे देखील निर्देश आहेत. मात्र विसर्जन मिरवणुकीत सुमारे १३० डेसिबलची मर्यादा ओलांडण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलून आरोपी तरुण बेपत्ता; एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

SCROLL FOR NEXT