Laser Light Sakal
पुणे

Leser Light : 'लेझर लाईट' मुळे दृष्टी झाली अधू; गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान घडला प्रकार

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सच्या अती वापरामुळे सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाल्याने त्याला अंशत: अंधत्व आले आहे.

जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता - गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे आणि लेझर लाईट्सच्या अती वापरामुळे सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाल्याने त्याला अंशत: अंधत्व आले आहे. तरुणाच्या डोळ्याच्या रेटिनाला गंभीर इजा  झाल्याने हा परिणाम झाल्याचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी संगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरात राहणारा अनिकेत अनंत चतुर्दशीच्या दिवशी पर्वती पायथा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. नाचत असताना डिजेवरील लेजर लाईट त्याच्या एका डोळ्यावर पडला. यावेळी त्याला डोळ्याला काही वेदना किंवा आग झाली नाही परंतु, त्याची दृष्टी मात्र अंधुक झाली.

यानंतर अनिकेत नेत्र तपासणी साठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांच्या कडे गेला. त्यावेळी परीक्षणाअंती त्यांनी अनिकेतच्या डोळ्याला लेझर लाईट मुळे गंभीर इजा झाल्याचे संगितले. त्याच्या डोळ्याच्या रेटीनावर परिणाम झाला असल्याचे सांगितले. पारेणामी त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास ७० टक्क्याने कमी झाल्याचे अनिकेतचे म्हणणे आहे अशी माहिती डॉ. दूधभाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काय आहे लेझर बर्न?

या लेझर लाईटची क्षमता पाच मिलीवॅट पेक्षा जास्त असल्यास; ती १० सेकंद एवढ्या कालावधी साठी जरी बाधीत झाली तरी रेटीनास गंभीर इजा होवू शकते. जे युवक त्या लेझर वारंवारितेच्या (फ्रिक्वेन्सी) केंद्रास्थ लांबी वर ('फोकल लेंग्थ') आले किंवा त्यांचे नेत्रपटल आले तर त्यांना अशा त्रासाला सामोरे जावे लागते.

अनिकेत सारखे अनेक रुग्ण असतील तर त्यांनी तातडीने नेत्ररोग तज्ज्ञाला दाखवावे. या सगळ्या तरुणांना झालेला नेत्रपटल दोष त्यांच्या शिक्षणावर आणि करीअर साठी भयावह ठरू शकतो. त्यासाठी हा लेझर लाईट टाळावा. या लेझर वापरावर नियम , निर्बंध आणण्याची गरज आहे. नाही तर याचे भयंकर परिणाम भविष्यात सोसावे लागतील. आणि त्यात अनेक निष्पाप लोकांची नजर जाईल.

- डॉ. अनिल दुधभाते, दुधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : भारतीय वायुसेनेतील जवानांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश; पूर्वपरवानगीशिवाय सेवा सोडता येणार नाही

Koyna Reservoir Renamed : आता कोयना धरण 'छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, पाहा काय आहे GR?

Malin Landslide: माळीण दुर्घटनेला १२ वर्षे! १५१ जणांना गिळणाऱ्या काळरात्रीची वेदना आजही कायम, दरडीत गाडले गेले संपूर्ण गाव

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याचा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली अन् ...

ED Raid Coal Mafia : देशातील मोठ्या कोळसा माफियावर ईडीची छापेमारी; ६०० कोटींची मालमत्ता, १६० कोटींचा म्युच्युअल फंड गोठवला

SCROLL FOR NEXT