Neelam Gorhe esakal
पुणे

Ganeshotsav : गणेश मंडळांचा गेल्या वर्षीचाच परवाना २०२६ पर्यंत चालणार

पुणे शहर व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गेल्या वर्षी गणेशोत्सवाचा परवाना घेतला असल्यास, हाच परवाना येत्या २०२६ पर्यंत वैध राहणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गेल्या वर्षी गणेशोत्सवाचा परवाना घेतला असल्यास, हाच परवाना येत्या २०२६ पर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी यंदा पुन्हा नव्याने परवानगी घेण्याची गरज नाही. याशिवाय आगामी गणेशोत्सवातील दहापैकी सहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी (ता.१९) एका बैठकीत बोलताना दिली.

शहर व जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडी हे उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत. यासाठी संबंधित सर्व यंत्रणा आणि गणेश मंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले. आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या या उत्सवांच्या नियमावलीबाबत डॉ. गोऱ्हे यांनी आज पुण्यात बैठक आयोजित केली होती.

या बैठकीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा पोलिस अधिक्षक (ग्रामीण) अंकित गोयल आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, ‘गणेश मंडळांना गेल्या वर्षी देण्यात आलेले परवाने हे आता २०२६ पर्यंत वैध राहणार आहेत. त्यामुळे अशा मंडळांना आता यंदा पुन्हा नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी याआधी परवानगी घेतली नसेल, अशाच मंडळांनी परवानगीसाठी अर्ज करावेत.

नागरिकांनी आपापल्या सूचना जिल्हाधिकारी, महापालिका आणि पोलिस आयुक्तालयाकडे सादर कराव्यात. या कार्यालयांकडे प्राप्त झालेल्या सूचनांवर प्रशासनाच्यावतीने सकारात्मक दखल घेऊन, त्यांचे निराकरण करण्यात येईल.’’ या बैठकीत प्रशासनाच्यावतीने गणेशोत्सव कालावधीत करण्यात येणाऱ्या पूर्वतयारीबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT