पुणे

गणेशोत्सव - ज्येष्ठ कार्यकर्ता

CD

गणेशोत्सव - ज्येष्ठ कार्यकर्ता
उपाध्यक्ष - चंद्रकांत के. पवार (वय ५०)
शिवप्रेमी तरुण मंडळ, अजमेरा कॉलनी

भाविकांच्या सेवेसाठी तत्पर

अजमेरा कॉलनी येथील प्रसिद्ध शिवप्रेमी तरुण मंडळाने या वर्षीही गणेशोत्सवात आपली सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा अभिमानाने जपली आहे. यंदा २६ वर्षात पर्दापण केले आहे. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उपाध्यक्ष चंद्रकांत के. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने सलग सहा वर्षे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे ‘उत्कृष्ट हलता देखावा’ पारितोषिक मिळविण्याचा बहुमान पटकावला आहे. मंडळाच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ‘क’ प्रभाग कार्यालयाकडूनही मंडळाला विशेष बक्षीस देऊन गौरवण्यात आले आहे. या वर्षी गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिवप्रेमी तरुण मंडळाने भाविकांच्या सुरक्षेला आणि सोयीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. उत्सव काळात येणाऱ्या हजारो भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खड्डेमुक्त आणि पूर्णपणे सुरक्षित मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना कोणत्याही त्रासाशिवाय गणरायाचे दर्शन घेता यावे, यासाठी चोख नियोजन करण्यात आले आहे. मंडळाचा मुख्य भर नेहमीच पौराणिक व सांस्कृतिक देखाव्यांवर असतो, ज्यातून आपल्या समृद्ध भारतीय संस्कृती आणि परंपरांचा प्रसार तरुण पिढीमध्ये व्हावा, हाच मुख्य उद्देश आहे. यंदा उत्सवात औचित्य साधून मंडळाने सलग सात दिवस ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामुळे अजमेरा कॉलनी आणि परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशस्वी आयोजनासाठी उपाध्यक्ष चंद्रकांत पवार आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

Xi Jinping दिल्लीत दाखल; सोबत काय आणले? 15 हजार पोलीस, ‘भयानक’ ताफा अन् खास कार-विमान

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Jharkhand Health : कॅन्सर रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयांत ‘डे-केअर सेंटर’, आयुष्मान कार्डधारकांना पॅकेज दरात उपचार

SCROLL FOR NEXT