पुणे

.

CD

‘गंगा एक्स्प्रेस-वे’चे आज लोकार्पण

मेरठ-प्रयागराज मार्गावर ५९४ किलोमीटरचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

सकाळ न्यूज नेटवर्क/पीटीआय
नवी दिल्ली, ता. २८ : दिल्लीला लागून असलेल्या मेरठ ते धर्मनगरी प्रयागराजपर्यंत बांधण्यात आलेल्या ५९४ किलोमीटर लांबीच्या ‘गंगा एक्सप्रेस-वे’चे उद्या, बुधवारी (ता. २९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उत्तर प्रदेशातील हा सर्वांत मोठा ग्रीनफिल्ड महामार्ग उत्तराखंडच्या हरिद्वारपर्यंत जोडला जाणार आहे. सध्या असलेला सहा पदरी महामार्ग भविष्यात आठ पदरी केला जाईल.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार ‘गंगा एक्सप्रेस-वे’च्या समांतर किंवा त्याला छेदणारा सुमारे ७०० ते ७५० किलोमीटर लांबीचा गोरखपूर-शामली ग्रीन फील्ड लिंक एक्सप्रेस-वे उभारण्याची योजना आखत आहे. हा भविष्यातील मेगा प्रकल्प राज्याच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागांना जोडण्याचे काम करणार आहे.

या शहरांना जोडणार

मेरठ, बुलंद शहर, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज

३६ हजार २३० कोटी
प्रकल्पाचा खर्च

१२
जिल्हे समाविष्ट

५१९
महामार्गावरील शहरे आणि गावे

३१
भुयारी मार्ग

१४
मुख्य पूल

१२६
लहान पूल

वैशिष्‍ट्ये
- गंगा एक्स्प्रेसवेवर अंदाजे साडेतीन किलोमीटर लांबीचा एअर स्ट्रीप  (विमाने उतरण्यासाठी धावपट्टी) बनवण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत हवाई दलाची विमाने या ठिकाणी उतरतील.
-गंगा एक्सप्रेस-वे यमुना एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाशीदेखील जोडला जाणार आहे.
-गंगा एक्सप्रेस-वे मुळे दिल्ली ते प्रयागराज पर्यंतच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

डिजिटल महामार्ग
‘गंगा एक्सप्रेस-वे’च्या बाजूने दोन मीटर रुंद ‘युटिलिटी कॉरिडॉर’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इंटरनेट केबल टाकण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कधीही रस्ता खोदावा लागणार नाही. या पूर्वनिर्मित कॉरिडॉरमध्ये ऑप्टिकल फायबर, गॅस पाइपलाइन, विजेच्या तारा किंवा इतर कोणत्याही वायर टाकता येतील. ‘एक्सप्रेस-वे’च्या खाली असलेले हे ‘डार्क फायबर’ उत्तर प्रदेशातील ५१९ गावांना आणि मागास जिल्ह्यांना ब्रॉडबँड महामार्ग उपलब्ध करून देईल. प्रत्येक गावाला हायस्पीड ‘फाइव्ह जी’ नेटवर्क मिळेल.

सुरक्षेसाठी काय?

-महामार्गावर ‘स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-सेन्सरयुक्त ‘एलईडी’ दिवे बसवले गेले आहेत.
-दर दोन-तीन किलोमीटरवर बसवलेले हाय रिझोल्युशन कॅमेरे आणि सेन्सर याच फायबर नेटवर्कशी जोडलेले आहेत.
-जमिनीखाली लपलेल्या या डिजिटल फायबर नेटवर्कमुळे एक्सप्रेस-वेचे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कार्यरत राहील.
- एखादी गाडी थांबल्यास किंवा अपघात झाल्यास ‘स्मार्ट ॲलर्ट सिस्टीम’ क्षणातच कंट्रोल रूमला सूचना पाठवेल. त्याजोगे मदत शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT