पुणे

गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने सामाजिक, सहकार क्षेत्रात हळहळ

CD

सहकार, विणकर चळवळीतील सोज्वळ नेतृत्व हरपले
गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने सामाजिक, सहकार क्षेत्रात हळहळ
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : सोलापुरातील विडी कामगारांसाठी आशिया खंडातील पहिल्या चार हजार घरांच्या घरकुल उभारणीपासून सहकारी सूतगिरण्यांच्या जाळ्यापर्यंत अनेक ऐतिहासिक उपक्रम उभारणारे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने सहकार, वस्त्रोद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू, संयमी व दूरदृष्टी असलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली. विणकर, कामगार आणि सहकार चळवळीशी आयुष्यभर बांधिलकी जपणाऱ्या कुचन यांनी सोलापूरच्या पूर्व भागात सहकाराचे मजबूत जाळे उभे केले होते.
.........
सोलापुरातील विडी कामगारांसाठी चार हजार घरांच्या आशिया खंडातील पहिल्याच घरकुलाच्या उभारणीची ऐतिहासिक कामगिरी माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांनी केली. विणकरांच्या हिताचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. सहकार, वस्त्रोद्योग, बँकिंग, मजूर संस्था आदी क्षेत्रांतील त्यांची कामगिरी लक्षणीय होती. सूतगिरण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महासंघाची स्थापना केली होती. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. एक अभ्यासू, संयमी आणि सोज्वळ नेता हरपला. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
विजयसिंह मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री
....
माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांच्या निधनाने समाजजीवनातील एक अभ्यासू, संयमी आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पद्मशाली समाजाच्या उन्नतीसाठी, सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी तसेच औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. ते मला ‘लढवय्या’ म्हणून संबोधत असत व प्रेरणा देत असत. ‘‘तुझी तगमग आणि तडफ कायम ठेव,’’ असे ते म्हणत असत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.
नरसय्या आडम मास्तर, माजी आमदार, सोलापूर
....
गंगाधरपंत कुचन हे सहकार क्षेत्रातील खूप मोठे नेते होते. अगदी कमी वयात त्यांनी सहकार क्षेत्रात संस्था उभारण्याचे कार्य सुरू केले. सोलापूर व यशवंतसारख्या अनेक सूतगिरण्यांची उभारणी त्यांनी केली. पूर्व भागात त्यांनी सहकाराचे जाळे विणले. दोन वेळा त्यांना लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. सार्वजनिक कार्यात अशा प्रकारचे दूरदृष्टी असलेले नेते दुर्मिळच.
बिपिनभाई पटेल, अध्यक्ष, अश्विनी सहकारी रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या नेटवर्कवर १०८ वातानुकूलित लोकल गाड्या चालवत

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Hadapsar Crime : काळेपडळ पोलिसांकडून सुमारे दहा लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT