पुणे

सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहास राज्यमान्यता द्यावी

CD

गंगागिरीजी महाराज सप्ताहास राज्यमान्यता द्यावी

राधाकृष्ण विखे ः मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्रीरामपूर, ता.२६ : लोकांच्या उत्स्फूर्त आणि विक्रमी सहभागामुळे सद्‍गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताह आता खऱ्या अर्थाने लोकोत्सव झाला आहे. आषाढी-कार्तिकीच्या वारीप्रमाणेच या अखंड हरिनाम सप्ताहाला देखील राज्य सरकारने अधिकृत ‘राज्यमान्यता’ द्यावी, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे.

धनगरवाडी येथे पार पडलेल्या झालेल्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार रमेश बोरनारे, विठ्ठल लंघे, आमदार अमोल खताळ आदी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की सात दिवसांच्या या सप्ताहात महंत रामगिरी महाराजांच्या अमृतवाणीतून सर्वांना जीवनाचे सार कळाले. परस्परांमध्ये बंधुभाव वाढवून व्यसनमुक्त समाज आणि राष्ट्र अधिक बलशाली करण्याचा संकल्प या सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात आले. महंत रामगिरीजी महाराज अव्याहतपणे अध्यात्माचा हा पवित्र वारसा पुढे घेऊन जात आहेत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा देशातील संपूर्ण आध्यात्मिक चळवळीला मोठे पाठबळ आणि प्रोत्साहन देणारा ठरला आहे.
.............
सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका ः विखे पाटील
हा सप्ताह आता द्विशताब्दीकडे वाटचाल करत असून, तो भारतातील आध्यात्मिक क्षेत्रातील एक अद्वितीय आणि ऐतिहासिक सोहळा ठरला आहे. लाखो भाविक-भक्तांच्या योगदानाने व जनशक्तीने या सप्ताहाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. म्हणूनच, आषाढी-कार्तिकीच्या वारीप्रमाणेच या सप्ताहाला देखील शासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेऊन, राज्य सरकारने या सोहळ्याला अधिकृत राज्यमान्यता प्रदान करावी.
------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT