Gangs vandalized for not allowing parking in front of shops in Pune 
पुणे

पुण्यात वाहनतोडफोडीचा थरार सीसीटिव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा

पुणे (कॅन्टोन्मेंट) : पुण्यात दुकानासमोर वाहन पार्किंग न करू दिल्याने एका टोळीकडून दुकान व वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे.  हा सर्व प्रकार काल सोमवारी दुपारी हरकानगरमध्ये घडला असून सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे

हरकानगर येथे श्री व्यकंटेश झेरॉक्स स्टेशनरीच्या दुकानासमोर राहणार उमेश गाडियाल (मंगळवार पेठ) या युवकाने दुचाकी वाहन पार्किंग केले होते.  यावेळी दुकानाचा मालक सनी म्हेत्रे या युवकाने येथे पार्किंग करू नको असे सांगितले. यावेळी उमेशने सनी याला शिवीगाळ करून ''दुकानाबाहेर ये'' असे सांगत धमकावले. पाऊण तासातच सात ते आठ मुलांची टोळी घेऊन दुकानाची तोडफोड करत चार चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात केली. यावेळी नोतेश निलेश म्हत्रे (वय 17) यामुलाला मारहाण करण्यात आली. तसेच एका युवतीला ही मारण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार 30 सप्टेंबरला दुपारी अडीचच्या दरम्यान झाला असून सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 

यावेळी सनी म्हेत्रे यांनी कासेवाडी पोलीस चौकी येथे तक्रार केली आहे. मात्र दुसरा दिवस उलटून ही याप्रकारची नोंद घेण्यात आली नाही. यावेळी पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

IPL 2026: विराट-धोनी आमने सामने येणार नाहीतच! MS Dhoni च्या खेळण्याबाबत नवी अपडेट समोर

Nagpur Bhosale Descendants : शिवरायांशी नागपूरच्या भोसले घराण्याचे नाते काय? नव्या पिढीचे वंशज आता काय करतात? पाहा वीरांचा वारस

Aniket Verma Inspirational Jounery : ३ वर्षांचा असताना आईचे निधन; वडिलांचे दुसरे लग्न... हार्दिक पांड्याची 'मॅगी' स्टोरी अन्...

MLC Election: एकनाथ शिंदे विधान परिषदेवर कोणाला पाठवणार? शिवसेनेच्या २ महिला चेहऱ्यांमध्ये जबरदस्त टक्कर; कुणाची लॉटरी लागणार?

SCROLL FOR NEXT