Pune Politics esakal
पुणे

Pune Politics: कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश

रुपेश नामदास

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी महापौर तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते.

कोथरूडमधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश झाला‌. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे.

त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपवर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज मोदी यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत.

कोथरूडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल,’’ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. या वेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, श्याम देशपांडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT