कारमधुन बेकायदेशिर रित्या 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेवुन जाताना पकडला.
इंदापूर - इंदापूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाईत इंदापूर - बारामती मार्गावरील निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोलापूर दिशेकडून बारामती कडे निघालेल्या टाटा कंपनीच्या हॅरीअर चार चाकी कारमधुन बेकायदेशिर रित्या 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी घेवुन जाताना पकडला. यामध्ये त्यांची किंमत 54 लाख 55 हजार पोलिसांनी 3 कारसह एकूण 80 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये पाच आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व प्रभारी पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसाना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सरडेवाडी गावच्या हददीत सापळा लावून खात्री करीत असताना एक आय20 व त्याच्या पाठीमागे एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची हॅरीअर व एक अल्टो कार संशयास्पद रित्या जाताना पोलीसांना दिसल्या. त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार न थांबता बारामती -पुणे बाजुकडे गेल्या. पोलीसांनी तिचा पाठलाग करीत निमगाव केतकी गावच्या हददीत सोनाई डेअरीजवळ ताब्यात घेतल्या. चौकशी करीत वाहनाची पाहणी केली असता हॅरीअर कार क्र.MH 42 BE 4925 च्या डिक्कीमध्ये व मधल्या सिट खाली खाकी रंगाचे चिकटपटटीचे आवरण असलेले पॅकेट्स दिसुन आले.
सदर कारमध्ये अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली त्यावेळी सदर कारला बेकायदेशीर रित्या वाहतुक करण्यासाठी आय20 कार नं. MH-05 CM-8500 व अल्टो कार नं. MH-18 V-365 हि मागे पुढे पायलेटींग करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने कायदेशिर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये अमिर गुलाब मुलाणी (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे), प्रकाश राजेंद्र हळदे (वय ३७ वर्षे, रा. सातव शाळेजवळ, बारामती. ता. बारामती, जि. पुणे. मुळ रा. मुखाई, एस टी स्टॅंड जवळ, ता. शिरूर, जि. पुणे) खंडु अश्रु परखड (वय २१ वर्षे, रा. पावणे वाडी, ता. बारामती, जि. पुणे. मुळ रा. लोणीपारवड वस्ती, ता. जामखेड, जि. अहमदनगर), रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप (वय ३३ वर्षे, रा. देसाई इस्टेट, किडा संकुल मागे, बारामती. मुळ रा. पणदरे, कौतुक नगर, सावतामाळी मंदिराजवळ, ता. बारामती, जि. पुणे) व सुरज भगवान कोकरे (वय ३२ वर्षे रा. हनुमंतवाडी, पणदरे, बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. सदरचा गाजा हा त्यांनी विशाखापट्टणम येथुन विक्रीसाठी आणला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.जप्त केलेल्या मध्ये कॅनाबियस वनस्पतीची पाने, फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असे एकुण 218 किलो 200 ग्रॅम वजानाचा अमली पदार्थ व तिन कार सह असा एकुण 80 लाख 55 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदर आरोपी विरुद्ध एन. डी. पी. एस. कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, प्रकाश पवार, ज्ञानेश्वर धनवे, महेश माने, दाजी देठे, सुधीर पाडुळे, गणेश जगदाळे, अमित सिदपाटिल, बाळासाहेब कारंडे, काशीनाथ राजापुरे, ए. डी. एकशिंगे, एस. एम. आहिवळे, शेळके, मोमीन, एम. एन. थिगळे, सतिश ढवळे, युवराज कदम, बी. एम. मोहिते, एस. बी. खान, व्ही. यु. काळे, व्ही. एस. राखुंडे, विशाल चौधर, सुर्यवंशी सर्व इंदापुर पोलीस स्टेशन यांचे पथकाने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.