Ganja Seized sakal
पुणे

Ganja Smuggling : आंध्र प्रदेशातून पुण्यात गांजाची तस्करी; एका महिलेसह तीन आरोपींना अटक

आंध्र प्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला ५२० किलो गांजा आणि इतर ऐवज गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आंध्र प्रदेशातून पुण्यात विक्रीसाठी आणलेला एक कोटी चार लाख रूपयांचा ५२० किलो गांजा आणि १५ लाख ७१ हजार रुपयांचा इतर ऐवज गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. आरोपींकडून दोन मोटारींवर महाराष्ट्र शासनाची पाटी लावून अमली पदार्थ विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. संदीप बालाजी सोनटक्के (वय २९, रा. दहिवली, पाली फाटा, खोपोली ता. खालापुर, जिल्हा रायगड), निर्मलाकोटेश्वरी मुर्ती जुन्नुरी (वय ३६, रा. चिलाकरलुपेठ, जिल्हा गुंटुर, आंध्रप्रदेश) आणि महेश तुळशीराम परीट (वय २९, रा. तुपगाव, ता. खालापुर, जिल्हा रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरात अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने कारवाई सुरू असताना पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात दोन वाहनांवर महाराष्ट्र शासनाची पाटी लावून आंध्रप्रदेश येथून मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी पुण्यात येत असल्याची माहिती पोलिस अंमलदार योगेश मांढरे यांना शनिवारी (ता‌.२) मिळाली.

याबाबत गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, पोलिस उपनिरीक्षक शुभांगी नरके यांच्या अमली पदार्थ विरोधी पथक-२ ने लोणीकंद परिसरात छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून दोन मोटारींसह ५२० किलो ५५० ग्रॅम गांजा, चार मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस कर्मचारी शिवाजी घुले, संतोष देशपांडे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, मयुर सुर्यवंशी, मनोज साळुंके, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, दिनेश बास्टेवाड, सिंहगड पोलिस ठाण्यातील अविनाश कोंडे, ऋषिकेश महाले, सलिम तांबोळी, किरण बरडे यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT