ganpati immersion sakal
पुणे

Ganeshotsav : विसर्जनसाठी साडेचारशे कृत्रिम हौदांची व्यवस्था

गणेशोत्सवासाठी मंडळांप्रमाणे महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांना सुविधा देण्यासह विसर्जन घाटावरील नियोजनाचा आढावा घेतला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवासाठी मंडळांप्रमाणे महापालिकेनेही तयारी सुरू केली आहे. गणेश मंडळांना सुविधा देण्यासह विसर्जन घाटावरील नियोजनाचा आढावा घेतला जात आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी विसर्जनासाठी हौद, निर्माल्य संकलन, मूर्ती दान केंद्राची माहिती सादर करण्याच्या सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.

यंदा फिरते हौद नसल्याने व नैसर्गिक प्रवाहात मूर्ती विसर्जनावर बंदी असल्याने महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागात सुमारे ४५५ कृत्रिम हौदांची व्यवस्था केली जाणार आहे.

प्रदूषण नियंत्रण महामंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीच्या उत्पादनावर बंदी घातलेली आहे. पण नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात ही बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेले काही वर्ष महापालिकेतर्फे पीओपीच्या मूर्तींचे पाण्यात विघटन व्हावे यासाठी ऍमोनियम बायकार्बोनेटची पावडर खरेदी केली जात होती. पण प्रदूषण महामंडळाने पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी आणल्याने महापालिकेने ही खरेदी केली नाही.

पण आता विधीमंडळात पीओपीच्या मूर्ती उत्पादन, विक्रीवरील बंदी उठविण्यात आलेली नसल्याने विसर्जनामध्ये पीओपीच्या मूर्तीचे प्रमाण वाढणार आहे. ऍमोनियम बायकार्बोनेटची पावडर नाही. त्यामुळे नागरिकांकडून नदी, नाले, कॅनॉल, विहिरी यासह इतर नैसर्गिक जलस्रोत असलेल्या ठिकाणी या मूर्ती विसर्जित करून हे ठिकाण प्रदूषित करू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जाणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयांना मुर्ती संकलन केंद्र, कृत्रीम विसर्जन हौदांची संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून घनकचरा व्यवस्थापन विभागाने माहिती मागवली आहे. प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे ४५५ हौदांची व्यवस्था होऊ शकते असे समोर आले आहे. आवश्‍यकतेप्रमाणे यामध्ये वाढ केली जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

येत्या आठवड्यात बैठक

गणेशोत्सवापूर्वी महापालिकेत गणेश मंडळाची बैठक घेतली जाते. यामध्ये कार्यकर्ते त्यांच्या समस्या, मागण्या मांडतात. त्यावर महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी समन्वय साधून योग्य त्यावर तोडगा काढतात. ही बैठक येत्या आठवड्यात होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींना मानवंदना

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १५ ऑगस्ट २०२६ ते २१ ऑगस्ट २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT