पुणे

थेऊर येथील श्री चिंतामणी गणपतीचे मंदिर बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीचे मंदिर बुधवारी (ता. ३१) संकष्टी चतुर्थीला बंद ठेवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, बुधवारी संकष्टी चतुर्थीला वीस ते पंचवीस हजार भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

बरेच यूजर्स कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करून बॅटरी वाचविण्याचा प्रयत्न करतात. वाचा सविस्तर 

संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भाविकांच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढू शकतो. कोरोनाचा वाढता धोका पाहून अनेक धार्मिक स्थळे, तसेच सार्वजनिक कार्यक्रम रद्दकरण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर थेऊरचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी घेतला आहे.

दरम्यान, पूर्व हवेलीतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.  तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वाढत्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यामुळे श्री चिंतामणी गणपती मंदिर पुढील सूचना मिळेपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करून प्रशासनास सहकार्य करावे. -आनंद तांबे, विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Sunday Gold Rate: रविवारी सोनं पुन्हा घसरलं! मुंबईतले भाव सर्वात कमी; तुमच्या शहरातले दर काय?

SCROLL FOR NEXT