Ganpati Visarjan 2022 Rose flowers to police protest against unrestricted procession pune sakal
पुणे

निर्बंधमुक्त मिरवणुकीच्या निषेधार्थ नागरीकांकडून पोलिसांना गुलाब पुष्प देत 'गांधीगिरी'

पुणेकरांच्या गटाकडून पोलिसांनाच नोटीस देत निषेध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबाव तंत्रामुळे गणेशोत्सवात अनेक मंडळांनी ध्वनीप्रदुषण नियमांचे उल्लंघन करूनही त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची कारवाई पोलिसांनी केली नाही. त्याबाबत पुणेकरांच्या गटाने सोमवारी पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देत निषेध नोंदविला. तसेच विसर्जन मिरवणुकीतील गैरव्यवस्थापनाबाबत पोलिसांना नोटीस देऊन त्याचे उत्तर देण्यात आली आहे. पुणेकरांच्या एका गटाने सोमवारी सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांना निवेदन व गुलाबपुष्प दिले. यावेळी डॉ. विश्वंभर चौधरी, मुकुंद किर्दत, निखिल जोशी, उत्पल व्ही. बी., ॲड. अजित देशपांडे, ॲड. अक्षय देसाई, ॲड. तृणाल टोणपे आदी यावेळी उपस्थित होते.

विसर्जन मिरवणुकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला वेळ, ढोल ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे दुर्लक्ष, मिरवणुकीतील कायदा-सुव्यवस्था राखण्यात आलेले अपयश, ध्वनीवर्धकांचा वापर, प्रखर प्रकाशझोत अशा मुद्यांकडे लक्ष वेधणारी नोटीस पोलिसांना देण्यात आली आहे. या नोटीशीला येत्या सात दिवसात पोलिस प्रशासनाने उत्तर न दिल्यास कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही पुणेकर नागरिकांच्या या गटाने दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP News: “झाडे आहेत तरच आयुष्य आहे!” योगी आदित्यनाथ यांचा ग्लोबल वॉर्मिंगवर इशारा; वनसंवर्धनावर भर...

Marathi Book Review : वाघांच्या थरारक कथांचा संग्रह: 'कथा वाघांच्या' पुस्तकाचा आढावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 मार्च 2026

वृषभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात आर्थिक स्थैर्य, पगारवाढीचे संकेत

Marathi Literature and Biographies : मराठी साहित्याचा नवा खजिना: 'ते बहात्तर दिवस' आणि 'अक्षरछाया' ग्रंथांचे स्वागत

SCROLL FOR NEXT