manjari
manjari 
पुणे

मांजरी परिसरात गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप

कृष्णकांत कोबल

मांजरी : आकर्षक देखावे, फुलांची सजावट व विविध प्रकारचे सामाजिक संदेश देत परिसरातील सार्वजनिक मंडळांनी जयजयकाराच्या घोषात भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. मुळा-मुठा नदी व नव्या कालव्यात मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.

पंधरा नंबर येथील श्रमिक मित्रमंडळाने फुलांनी सजविलेल्या रथातून विसर्जन मिरवणूक काढली होती. त्यावर मल्लखांब पथकाने विविध चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणूकीत सहभागी झालेल्या गणेशाच्या वेशातील मुलांनी प्लॅस्टिक बंदीचा तसेच महिला कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. मंडळ दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत सामाजिक संदेश देण्याची प्रथा कार्यकर्त्यांकडून जपली जात आहे. संस्थापक संदीप दळवी, अध्यक्ष प्रशांत दौंडकर यांनी मिरवणूकीचे संयोजन केले.

महादेवनगर येथील नवरंग कला क्रीडा मंडळाने  फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढली होती. मिरवणूकीत महिलांचा सहभाग मोठा होता. उदय मित्र मंडळा व अखिल महादेवनगर युवा मंचानेही पारंपरिक पद्धतीने व गणरायाचा जयघोष करीत सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली होती. रविंद्र गोगावले, प्रशांत घुले, सुनील घुले, कुलदीप यादव यांनी संयोजन केले. 

घुलेवस्ती येथील जयमल्हार, हनुमान, गोपाळपट्टी येथील नवज्योत, दीपज्योत मित्र मंडळानेही आकर्षक मिरवणूकांचे आयोजन केले होते. सतोष टकले, देवेंद्र कांबळे, दत्ता घाडगे, जयराज घुले, अक्षय घुले आदींनी संयोजन केले. 

मांजरी गावातील शिवशंकर मित्रमंडळाने पारंपारिक वाद्यांच्या गजरात व सजवलेल्या रथातून चित्ताकर्षक मिरवणूकीचे आयोजन केले होते. नादब्रम्ह ढोलताशा पथकाने विविध ताल प्रात्यक्षिके सादर केली. उपसरपंच अमित घुले, सदस्य सुमीत घुले, अध्यक्ष सुभाष घुले, अँड. साईलेश म्हस्के आदींनी संयोजन केले. गावठाणचा राजा मित्रमंडळानेही जयघोष करीत पारंपरिक पद्धतीने गणरायाला निरोप दिला. अभिजित घुले यांनी संयोजन केले. बेल्हेकर वस्ती येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठाननेही पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढली होती.

शेवाळेवाडी येथील आनंदस्मृती कला क्रीडा मित्रमंडळ, शिवशक्ती, नवनिर्माण युवा प्रतिष्ठान, साडेसतरानळी येथील ए वन, शिवशंभो आदी मंडळानी आकर्षक मिरवणूकांचे आयोन केले होते. विक्रम शेवाळे, विशाल ढोरे यांनी संयोजन केले.

डीजेला बंदी असूही परिसरातील काही मंडळांनी मिरवणुकीत त्याचा वापर केल्याचे दिसले. त्यावर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश आले नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व वाढलेल्या हद्दीमुळे त्यांना मोठी धावपळ करावी लागली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT