पुणे

...म्हणून गणपतराव देशमुख संसदीय लोकशाहीतील पितामह : हर्षवर्धन पाटील

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : राज्य विधिमंडळ सभागृहामध्ये गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांनी सकारात्मक, रचनात्मक व विकासात्मक भूमिकेतून कामकाज करत संसदीय प्रथा व परंपरांचे पालनकरून आदर्श निर्माण केला. विरोधासाठी विरोध न करता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिल्याने गणपतराव देशमुख हे संसदीय लोकशाहीतील पितामह होते, या शब्दात भाजप नेते तसेच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

पाटील पुढे म्हणाले, ''दिवंगत खासदार व माझे काका कर्मयोगी शंकरराव पाटील व गणपतराव देशमुख यांनी विधिमंडळात अनेक वर्षे एकत्र काम केल्याने इंदापूर व सांगोला तालुक्याचे अनोखे नाते तयार झाले.विधिमंडळ सभागृहात रोजगार हमी योजना कायदा व इतर लोकोपयोगी कायदे निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विधिमंडळाचे त्यांनी सलग अकरा वेळा प्रतिनिधित्व करीत संसदीय लोकशाही कशी सांभाळायची याचा आदर्श घालून दिलेले ते ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. रोजगार हमी व पणन खात्याचे मंत्री म्हणून त्यांचा गाढा अभ्यास होता. सांगोला सारख्या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून टेंभू, म्हैसाळ आदी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. पक्ष, नेता व संघटनेवर कशी निष्ठा असावी, याचेउत्तम उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होत. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या या नेत्याची राज्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशी ओळख होती. असा नेता पुन्हा होणे नाही, ''या शब्दात पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्कर

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

SCROLL FOR NEXT