Garbage Sakal
पुणे

शिवाजीनगर : बेशिस्त नागरिकांचा व्यवसायिकांना त्रास

जनवाडी येथील अरुण कदम चौकाजवळ महापालिकेच्या वतीने कचऱ्यासाठी बकेट (कंटेनर) ठेवण्यात आला आहे.

समाधान काटे

शिवाजीनगर - जनवाडी येथील अरुण कदम चौकाजवळ महापालिकेच्या वतीने कचऱ्यासाठी बकेट (कंटेनर) ठेवण्यात आला आहे. महापालिकेने इतर ठिकाणी कंटेनर ठेवणे बंद केले असताना, या चौकात कंटेनर ठेवण्यात येतो, त्यामुळे गोखलेनगर, जनवाडी, जनता वसाहत येथील नागरिक कंटेनरच्या शेजारी कचऱ्याची पिशवी भिरकावून देतात, शिळे अन्न, घरातील कचरा, कॅरी बॅग, कपडे, भाजीपाला इत्यादीचा कचरा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचतो. बकेटच्या आसपास अनेक व्यवसाय असल्याने कचऱ्याचा त्रास व्यावसायिकांना होत आहे. त्या ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून पाच- सहा व्यावसायिक, स्थानिक रहिवासी मध्यरात्री दोन अडीच वाजेपर्यंत बकेटच्या शेजारी बसलेले असतात. कचरा घेऊन येणाऱ्या नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकू नका असे सांगतात, त्यानंतर काही नागरिक बकेटमध्ये कचरा टाकतात. तर काही त्यांच्याशीच हुज्जत घालत रस्त्यावर कचरा टाकतात. या ठिकाणी बकेट ठेवू नये असे व्यावसायिक म्हणतात. नागरिकांनी शिस्त पाळून कचारा घंटागाडीत दिला तर रस्त्यावर पाडणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल.

'समाजसेवेच्या दृष्टीने आम्ही तिथं थांबून नागरिकांना कचरा बकेटमध्येच टाकायला सांगतो. समोर वस्ती, मार्केट आहे, लहान मुलं खेळतात, रस्त्यावर कचरा टाकला की दुर्गंधी पसरून रहदारीला त्रास होतो. बस आली तर वाहतूक कोंडी होते. कचऱ्याने बकेट भरल्यानंतर आम्ही प्रशासनाला कळवतो तर ते वेळेवर येत नाहीत'. नागरिक म्हणतात 'कचरा पेटी असल्याने आम्ही कशाला पैसे देऊन कचरा देयचा'.

- वासिम खान, व्यवसायिक अरुण कदम चौक जनवाडी.

'नागरिकांनी कचरा पेटीतच टाकावा म्हणून जनजागृती करतो. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत आम्ही कचरापेटी शेजारी थांबलेलो असतो. या ठिकाणची कचरा पेटी काढून टाकावी, नागरिक घंटागाडीला पैसे देत नाहीत, रस्त्यावर कचरा आणुन टाकतात. प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करायला हवे'.

- रोहित चव्हाण, व्यावसायिक अरूण कदम चौक,जनवाडी.

"त्या ठिकाणचा कचरा नियमित उचलत असतो. झोपडपट्टी भाग असल्याने नागरिक रस्त्यावर कचरा आणून टाकतात. आम्ही कित्येक वेळा रात्री बारा वाजेपर्यंत तिथं थांबलो होतो. रस्त्यावर कुठेही कचरा पडण्यापेक्षा त्या ठिकाणी बकेट ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या व्यावसायिकांशी बोलून मार्ग काढला जाईल".

- तुषार राऊत, आरोग्य निरीक्षक शिवाजीनगर - घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय.

बुलेट्स

  • पैसे भरून सेवकांकडे कचरा देण्यास नागरिकांची टाळाटाळ

  • कंटेनर रस्त्यावर असल्याने दुर्गंधी व वाहतूक कोंडीत भर

  • स्थानिक व्यवसायिकांना कचऱ्याचा त्रास

  • बेशिस्त नागरिकांमुळे प्रशासन व स्थानिक रहिवाशांच्या कचऱ्याची समस्या

  • कंटेनर काढून टाकण्याची नागरिकांची मागणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT