Sakal-Impact 
पुणे

कचरा जाळणे बंद, पण...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आकुर्डी आणि चिंचवड रेल्वे स्टेशन जोडणाऱ्या नवीन रस्त्यालगतच्या कचरा संकलन केंद्राजवळ दररोज मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात होता. त्याचा परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच सोमवारी (ता. १९) कचरा जाळणे बंद झाले, त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. 

पालिकेचे कर्मचारीच कचरा जाळत असल्याचा नागरिकांचा आरोप होता. मात्र, आपण असा कोणताही कचरा जाळत नसून, तो मोशी डेपोत घेऊन जात असल्याचे स्पष्टीकरण कर्मचाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्‍वभूमीवरच सोमवारी या परिसराची पाहणी केली असता, कचरा जाळला नसल्याचे आढळून आले.

भंगारवाले जाळायचे कचरा?
प्लॅस्टिक व भंगार वेचल्यानंतर संबंधित भंगार व्यावसायिकांकडून हा कचरा जाळला जात असल्याचे काही लोकांनी सांगितले. त्याअनुषंगाने परिसराची पाहणी असता केंद्राच्या परिसरात भंगार गोळा करणारे आढळले. घरोघरचा कचरा गोळा करून घंटागाडी केंद्रावर आल्यानंतर त्यातील कचरा कंटेनरमध्ये टाकला जातो. त्यातील प्लॅस्टिक, लोखंड वेचले जाते. टायर किंवा वायर जाळून त्यातील तारा काढल्या जातात. त्यामुळे निर्माण झालेल्या धुराचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो. सोमवारी कचरा जाळलेला नव्हता. 

रस्त्यावर कचरा टाकणे व जाळण्यास बंदी आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पथके नियुक्त केली आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manjeet Kaur Punjab Influencer : पंजाबची इन्फ्लुएन्सर मंजीत कौरची हत्या, जंगलात नेऊन जाळलं; दोघांनी झाडाला बांधून जे केलं ते भयानक

Ladki Bahin Scheme: लाडकी बहीण योजनेत एसी-एसटी विभागाचा निधी वळविल्याचा आरोप; १४,६०१ कोटींचा निधी परत करा

H1N1 and Eye Health: H1N1चा डोळ्यांवरही होतोय परिणाम? स्वाइन फ्लूनंतर दिसणारी ‘ही’ 7 लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT