पिंपळेसौदागर - ओला आणि सुका कचऱ्याचे केलेले वर्गीकरण. 
पुणे

निम्म्या कचऱ्याचे वर्गीकरण

पीतांबर लोहार

पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या ९०० मेट्रिक टन कचऱ्यापैकी सुमारे ४८ टक्के कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. यात घरोघरच्या कचऱ्याचे आठ टक्के आणि मोशी कचरा डेपो येथे ४० टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. स्मार्ट सिटी होण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात घरोघरी कचऱ्याचे शंभर टक्के वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. 

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेतर्फे शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. शहराच्या निम्म्या भागातील घरोघरचा कचरा गोळा करून मोशी कचरा डेपोत नेण्याचे काम बीव्हीजी क्षितिज वेस्ट मॅनेजमेंट संस्थेतर्फे केले जाते. उर्वरित कचरा ठेकेदारांच्या कामगारांमार्फत कचरा डेपोत नेला जातो. मात्र, राज्य सरकारच्या घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार रोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था, सोसायट्यांनी स्वतःच कचऱ्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. त्याला बोटावर मोजण्याइतक्‍याच सोसायट्यांचा प्रतिसाद मिळत आहे; तसेच कंपन्यांमधील रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणेही आवश्‍यक आहे. 

बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प
महापालिकेने जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वायसीएम रुग्णालयाच्या आवारात बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प उभारला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ई-कचरा संकलन आणि मॅकेनिकल कंपोस्ट प्लॅंट व गांडुळखत प्रकल्प उभारला आहे.

जनजागृती उपक्रम
स्वच्छ अभियानात लोकसहभाग वाढविण्यासाठी नागरिकांशी थेट संपर्क साधून हस्तपत्रके, सोशल मीडिया जाहिराती, पथनाट्ये, शाळा कॉलेज माध्यमातून, प्रभातफेरी, स्वच्छता दिवस असे उपक्रम राबवून जनजागृती केली जात आहे.

कचरा जिरवणाऱ्या सोसायट्या
 रोझलॅड, पिंपळे सौदागर
 गोखले वृंदावन, चिंचवडगाव
 स्वरगंगा, वल्लभनगर

महापालिकेने मोशी कचरा डेपो येथे शास्त्रीय पद्धतीने डंपिंग ग्राउंड उभारले आहे. त्याचे क्षेत्र सुमारे ८१ एकर आहे. वेस्ट टु एनर्जी, सीअँडडी वेस्ट प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Dalit discrimination : देशात अद्यापही दलितांसोबत भेदभाव; चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे कप : राहुल गांधी

Mumbai Crime: मुंबई-नाशिक महामार्गावर दरोडेखोरांचा थरार, पोलिसाकडूनच ६१ लाखांची लूट, पाच जणांना अटक

Manoj Jarange Maratha Reservation : 'निर्णय झाला नाही तर मुंबईला येणार'; मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीत बारावे आमरण उपोषण सुरू, सरकारला दिला थेट इशारा

Maharashtra Monsoon Prediction : नेपाळच्या पूरस्थितीत अडकलेले संगमनेरचे ४५ पर्यटक सुखरूप भारतात परतले

जीएसटी माफ करण्यासाठी दीड कोटींची मागणी, 40 लाखांची लाच घेताना CGSTचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षकासह तिघांना अटक

SCROLL FOR NEXT