पुणे

लोणंद - विरोधी नगरसेवकांचा अंदोलनाचा इशारा.

CD

कचराप्रश्नी विरोधी नगरसेवक आक्रमक

लोणंदला मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब; आंदोलनाचा इशारा


लोणंद, ता. १४ : येथील कचऱ्याच्या प्रश्नाबाबत विरोधी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांना जाब विचारला. या प्रश्नी आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास नगरपंचायतीसमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा विरोधी नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीकडून शहरातील कचरा संकलनाबाबत हलगर्जीपण केला जात असल्याने शहरात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढिग, तेथे पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाल्याचा आरोप त्यांनी केला.
विरोधी नगरसेवकांनी गेली आठ दिवस कचरा गाडी फिरत नसल्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात पाच कचरागाड्या आणि दोन ट्रॅक्टर असतानाही अनेक भागांत कचऱ्याचे संकलन केले जात नाही.
उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांच्या नेतृत्वाखाली महिला बालकल्याण समितीच्या सभापती राजश्री शेळके- पाटील, नगरसेविका दीपाली संदीप शेळके- पाटील, दीपाली नीलेश शेळके- पाटील, ज्योती डोणीकर, तृप्ती घाडगे, आसिया बागवान व प्रवीण व्हावळ आदी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नांबाबत जाब विचारला.
विरोधी नगरसेवकांनी २५ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला कचरा गाड्यांचा रूट मॅप मागितला असतानाही गेली दोन महिने प्रशासन याबाबत टाळाटाळ करत असल्याचे सांगितले. दरम्यान, दोन दिवसांत शहरातील सर्व प्रभागांतील कचरा संकलित करावा, आठ दिवसात शहरातील कचरा गाड्यांचे रूट मॅप जाहीर करावेत, अशी सूचना यावेळी उपस्थित नगरसेवकांनी प्रशासनास केली.
यावेळी इक्बालभाई बागवान, राजेंद्र शेळके- पाटील, राहुल घाडगे, संदीप शेळके- पाटील, राजाभाऊ खरात, नीलेश शेळके- पाटील, दीपक डोणीकर आदी उपस्थित होते.

------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पालघरमध्ये कलर कंपनीला भीषण आग; केमिकलच्या भडक्याने आगीचा लोट

Sugarcane Rate Agitation : ऊसदराच्या आंदोलनामुळे कोगनोळी टोलनाक्यावरील वाहतूक ठप्प; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

'या गोजिरवाण्या घरात' मधली दीक्षा आठवते? सध्या काय करते? सांगितलं छोट्या पडद्यावर न दिसण्याचं कारण

SCROLL FOR NEXT