कचऱ्यावरून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी
राजूर, ता.२२ : घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणात काठी, लोखंडी रॉड, पाइप आणि दगडांचा वापर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबांकडून एकमेकांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत रेखा भरत तारगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरासमोर कचरा उचलून टाकण्याच्या कारणावरून शेजारी कैवल्य एलमामे यांनी त्यांच्या अंगणातील कचरा रस्त्यावर टाकल्याने वाद झाला. यावरून कैवल्यसह पवन, सुनीता, लक्ष्मीबाई व मोनिका एलमामे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. पवन याने काठीने रेखा यांच्या हातावर, तर भांडण सोडविण्यास आलेल्या भरत तारगे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कैवल्य एलमामे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रेखा, भरत, साहिल, हेमंत, अशोक, पूजा व एकाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रेखा यांनी वाद घातल्यानंतर लोखंडी रॉडने पायावर मारल्याचे, तर भरत यांनी काठीने मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे, तसेच पवन व लक्ष्मीकांत यांनी पाइप व दगडाने मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादी दाखल करून घेतल्या असून पुढील तपास सुरू आहे.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.