narhe sakal
पुणे

नऱ्हे गावातील कचराप्रश्‍न गंभीर!

रस्त्यालगत कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा

धायरी : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नऱ्हे गावातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गाव महापालिकेत समाविष्ट केले खरे, मात्र मूलभूत सुविधाच न दिल्याने कचऱ्याचा ताण वाढत आहे. वाढलेला कचरा उचलण्यासाठी यंत्रणेला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. काही अज्ञातांकडून रस्त्यालगत कचरा फेकला जात रोगराईला आमंत्रण मिळत आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने घनकचरा व्यवस्थापन ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांना मोठ्या कचरा समस्येला सामोरे जावे लागत आहे. नऱ्हे गावात दररोज जवळपास ६० टन कचरा जमा होत आहे. त्यातील रोज ३० टन कचरा हा ठेकेदारांमार्फत उचलला जात होता, मात्र तो अचानक बंद झाला. मिक्स कचऱ्याचे अनेक ठिकाणी स्पॉट तयार झाले आहेत. घंटागाड्या बंद झाल्यामुळे लोक निर्जनस्थळी, हायवेलगत कचरा टाकू लागले आहेत. पावसामुळे कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न त्यामुळे ऐरणीवर येत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे.

अशा परिस्थितीत सहायक आयुक्त जयश्री काटकर बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन करताना नऱ्हे गावामध्ये सात भाग करण्यात आले, तसेच २२ ठिकणी कचरा संकलन केंद्र तयार करण्यात आली. यावर सेवकांची रात्रपाळी व दिवसपाळीत नेमणूक केली, तरीही कचरा समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

नऱ्हे गावातील कचऱ्याच्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यात येईल. परिसरात अज्ञातांकडून रस्त्यालगत कचरा फेकला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. जनजागृतीची गरज असून, ५३४ आस्थापनांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. रस्त्यावर कचरा फेकल्यास दंडात्मक कारवाईशिवाय पर्याय राहणार नाही.

- आशिष सुपनार, वरिष्ठ आरोग्य निरिक्षक, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : हॉटेल व्यावसायिक गॅसवर! व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा मर्यादीत, पाइपलाइन गॅसचा ८० टक्केच वापर करण्याची सूचना

Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला जामीन मंजूर

Latest Marathi News Update : राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Disabled Scheme: तब्बल ३० वर्षांनंतर मोठा बदल! महायुती सरकारने दिव्यांगांसाठी आर्थिक मदत ₹१५,००० पर्यंत वाढवली; अर्ज कसा करायचा?

Women Employees: महिला कर्मचाऱ्यांसाठी गेम-चेंजर निर्णय! ‘लवकर या-लवकर जा’ योजना जाहीर; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT