पिंपळे सौदागर - रोझलॅंड सोसायटीतील ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पात काम करताना कामगार. 
पुणे

कचरा प्रक्रिkया प्रकल्प तुम्हीही उभारा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रोज शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या सोसायट्यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्प स्वतः उभारावा, असे आवाहन महापालिकेने केले होते. त्याला बहुतांश सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘आम्ही प्रकल्प उभारला, तुम्हीही उभारा’, असे आवाहन अन्य सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेतर्फे शहरात जनजागृती केली जात आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार आपले घर, परिसर, व्यवसाय आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे सर्वांना बंधनकारक केले जात आहे. रोज शंभर किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्था व सोसायट्यांनी कचरा निर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करायचे आहे. ओल्या कचऱ्यावर स्वतः प्रक्रिया करायची आहे. त्याला पिंपळे सौदागर येथील रोझलॅंड, वाकडमधील पलाश, चिंचवडगावातील गोखले वृंदावन यांसह अनेक सोसायट्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वतःचे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारून अन्य सोसायट्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

शहरातील लोकसंख्या आणि घरोघरचा कचरा गोळा करणाऱ्या गाड्या व कर्मचारी यांचे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे वारंवार कचऱ्याचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे. काही जण म्हणतात आम्ही कर भरतो. पण, सर्वच बाबतीत महापालिकेवर अवलंबून राहून चालणार नाही. सामाजिक दायित्व म्हणून सर्व सोसायट्यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला पाहिजे. आम्ही १३ लाख रुपये खर्चून दीड वर्षापूर्वी प्रकल्प उभारला. त्यामुळे सोसायटीतील कचऱ्याचा प्रश्‍न सुटला आहे. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्माण करून शेतकऱ्यांना दिले जात आहे. 
- किरण वडगाम, अध्यक्ष, पलाश सोसायटी, वाकड

स्वच्छ भारत अभियान सुरू होण्यापूर्वीपासून आम्ही कचऱ्यावर प्रक्रिया करणे सुरू केले आहे. सुरवातीला ३०-४० जण घरामध्येच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करीत होतो. त्यानंतर चार सदनिकांमधील सभासदांनी उपक्रम सुरू केला. आता सर्व ९८० सदनिकांमधील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्माण केले जात आहे. स्वतःची जबाबदारी म्हणून प्रत्येकाने कचरा जिरवला पाहिजे. ‘माय वेस्ट, माय रिस्पॉन्सिबिलिटी’ असे आमचे स्लोगन आहे. आतापर्यंत तीनशेपेक्षा अधिक सोसायट्यांना आम्ही भेट दिली असून तितक्‍याच सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली आहे. 
- संतोष म्हसकर, अध्यक्ष, रोझलॅंड सोसायटी, पिंपळे सौदागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT