पुणे

बालेवाडी येथील कचरा विलगीकरण केंद्राला पुन्हा आग

शीतल बर्गे

बालेवाडी : येथील मुंबई-बंगळूर महामार्गालगत कचरा विलगीकरण केंद्राला शनिवार (ता. 3 रोजी) रात्री मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर रात्री आग विझविली.

बालेवाडी येथील मुंबई-बंगळूर महामार्गालगत पीएमपीएल बस आगाराजवळच महापालिकेचे कचरा विलगीकरण केंद्र आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री नऊच्या दरम्यान आग लागली. गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी दोनदा आग लागली आहे. या ठिकाणी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याचे काम होते.

येथे वेगळा केलेला सुका कचरा प्रक्रिया करण्यासाठी हडपसर जवळील कचरा प्रक्रिया केंद्रावर पाठवला जातो. परंतू हे केंद्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. कालपासूनच या ठिकाणचा कचरा उचलायला सुरुवात केली होती, अशी माहिती आरोग्य अधिकारी नितीन लोखंडे यांनी दिली. पण रात्री नऊच्या सुमारास येथे आग लागली, आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.

यासंदर्भात अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमनचे जवान या ठिकाणी पोहोचले. पण कचरा जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरली असल्याने पाषाण अग्निशमनचे अधिकारी शिवाजी माने यांनी भवानी पेठ येथील वॉटर ब्राउजर 
बोलाविण्यात आला. दोन फायर इंजिन तसेच 14 हजार लिटरच्या वॉटर ब्राउजरच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. पाषाण अग्निशमन विभागाचे अधिकारी शिवाजी मेमाने,  जवान लाला मोरमारे,  किसन तरपाढे, गजानंद  बालघरे, किरण चौधरी, चालक  रमेश रंधवे यांनी मोठ्या प्रयत्नांनी  ही आग विझवण्यात आली.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT