पुणे

हांडेवाडी चौकाजवळ कचऱ्याचा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

चार तास वाहतूक झाली ठप्प; कात्रज-मंतरवाडी बायपास रस्त्यावरील घटना

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : कात्रज-मंतरवाडी बायपास रस्त्यावर हांडेवाडी चौकाजवळ महापालिकेच्या कचऱ्याचा ट्रक आज (बुधवार, दि. १५ डिसेंबर २०२१) सकाळी साडेनऊच्या सुमारास पलटी झाला. त्यामुळे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. ट्रकमधील कचरा रस्त्यावर पसरल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.दरम्यान, हांडेवाडी वाहतूक विभागातील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे, हवालदार संदीप गोवेकर, राहुल लेकावळे, पोलीस नाईक रेश्मा बनकर, अप्पा कोळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

हांडेवाडी चौकातील गतिरोधक रात्री-अपरात्री अंधारामध्ये दिसत नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. गतिरोधकावर रिफ्लेक्टर नसल्यामुळे कात्रजकडून येणारी वाहने जोरात येतात आणि गतिरोधकावर आदळून जीवघेणे अपघात होत असल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रासले आहेत. या ठिकाणी रस्त्यातील दुभाजकाला कटर असून येथे ब्लिंकर बसविण्याची गरज आहे, असे धनंजय हांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT